Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
मुकुल माधव विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा; कराटे स्पर्धेत विद्यार्थ्यांची ९ पदकांना गवसणी!
रत्नागिरीत ‘स्वदर्पण’ केंद्राच्या माध्यमातून मानसिक आरोग्याला नवी दिशा!
जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या बॉलवर जिल्हाधिकाऱ्यांचा ‘चौकार’
रत्नागिरीच्या समुद्रात युवाशौर्याचा जागर
नांदिवडे गॅस टर्मिनलच्या स्थलांतरासाठी ३० ऑक्टोबरची डेडलाइन; ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा
आरोपांमागचा खरा सूत्रधार कोण? उदय सामंतांच्या विधानाने चर्चेला उधाण
परिसरातील चालू घडामोडी

जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये १ ऑक्टोबरपासून ‘मेडीएशन फॉर नेशन ३.०’ विशेष मोहीम

सप्टेंबर 23, 2026 2 Min Read

अखिल भारतीय पातळीवर राबवली जाणारी ‘मेडीएशन फॉर नेशन ३.०’ ही विशेष मोहीम दिनांक १ ऑक्टोबर २०२६ पासून रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये सुरू होत आहे. या मोहिमेअंतर्गत १ ऑक्टोबर २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत न्यायालयातील प्रलंबित दावे, वाद तसेच तडजोडपात्र फौजदारी खटले मध्यस्थीद्वारे (तडजोडीने) निकाली काढले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव आर. आर. पाटील यांनी दिली.
यापूर्वी ‘मेडीएशन फॉर नेशन’ चे पहिले अभियान १ जुलै २०२५ ते ३० सप्टेंबर २०२५ या काळात राबवले गेले होते. त्यामध्ये मध्यस्थीसाठी पाठवलेल्या एकूण १,८३४ प्रकरणांपैकी ९१ प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली. त्यानंतर ‘मेडीएशन फॉर नेशन २.०’ हे अभियान २ जानेवारी २०२६ ते ३१ मार्च २०२६ दरम्यान पार पडले. यामध्ये पाठवलेल्या ८२२ प्रकरणांपैकी ५४ प्रकरणांत यशस्वी तडजोड झाली.
१५ विविध श्रेणींतील वादांचा समावेश:
‘मेडीएशन फॉर नेशन ३.०’ या मोहिमेत एकूण १५ विविध श्रेणींमधील प्रकरणे मध्यस्थीसाठी संदर्भित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने:
* वैवाहिक वाद आणि कौटुंबिक हिंसाचार
* मोटार अपघात नुकसानभरपाई
* चेक बाऊन्स (धनादेश अनादर) प्रकरणे
* तडजोडपात्र फौजदारी खटले
* ग्राहक तक्रार मंच प्रकरणे
* बँक कर्ज वसुली व दरखास्त
* लवाद आणि वाणिज्य (कमर्शियल) प्रकरणे
* सेवा विषयक वाद (सर्व्हिस मॅटर्स)
* वाटप, बेदखलपात्र आणि भूसंपादन प्रकरणे
* कामगार न्यायालय, विविध न्यायाधिकरणांतील प्रकरणे व इतर दिवाणी दावे
नागरिकांना सहभागाचे आवाहन:
पक्षकारांनी आपले वाद न्यायालयात प्रदीर्घ काळ न ताणता सामंजस्याने आणि जलद गतीने सोडवण्यासाठी ते मध्यस्थी केंद्राकडे संदर्भित करावेत आणि या विशेष मोहिमेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनोद जाधव यांनी केले आहे.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

‘लोकसंवाद -२०२६’ कार्यक्रमात सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती

Next

रत्नागिरीत ‘मिशन प्रबोधन’चा शुभारंभ; पोलिसांचा थेट नागरिकांशी संवाद

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech