
रत्नागिरीत ‘मिशन प्रबोधन’चा शुभारंभ; पोलिसांचा थेट नागरिकांशी संवाद
सप्टेंबर 23, 2026 1 Min Read

रत्नागिरी : जिल्हा पोलीस दलाने ‘मिशन प्रबोधन’ हा नागरिकाभिमुख उपक्रम सुरू केला असून ग्रामसभा ते थेट घरांपर्यंत नागरिकांशी संवाद साधण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या उपक्रमातून कायदा-सुव्यवस्था, सायबर गुन्हे, अमली पदार्थांचे दुष्परिणाम, महिला व बालकांची सुरक्षा याबाबत जनजागृती केली जाणार आहे.
पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत AI व डिजिटल माध्यमांचा वापर करून माहिती अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. ग्रामसभा, शाळा-महाविद्यालये आणि विविध वाडी-वस्त्यांमध्ये थेट संवाद साधण्यावर भर दिला जाणार आहे.







