Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेवर ‘जिल्हा सनियंत्रण समिती’ची करडी नजर
गणेशोत्सवात आरोग्य शिबिरांचे आयोजन करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल
गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी
आंबव येथील अभियांत्रिकी महाविद्यालय परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
गणेशोत्सवासाठी कोकणात चाकरमान्यांचा ओघ
गणेशोत्सवात अ‍ॅक्वा लाइन मध्यरात्रीपर्यंत सुरू; शेवटची मेट्रो रात्री 12 वाजता
परिसरातील चालू घडामोडी

केरळमध्ये भीषण अपघात; ट्रकवर कार आदळून ८ जणांचा मृत्यू

सप्टेंबर 5, 2026 1 Min Read

केरळमधील त्रिशूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग-६६ वर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकवर भरधाव कार पाठीमागून आदळल्याने या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तामिळनाडूतील विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, हा अपघात शुक्रवारी रात्री सुमारे ११.४० वाजण्याच्या सुमारास कॅपमंगलमजवळ पनमपिक्कुन्नू येथे झाला. मदुराई नोंदणीची ही कार गुरुवायूरहून कोडुंगल्लूरच्या दिशेने जात होती. राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याचे काम सुरू असल्याने त्याच दिशेने एक ट्रक रस्त्याच्या कडेला थांबला होता. याच ट्रकवर भरधाव कारने मागून जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या दुर्घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी असलेल्या एका व्यक्तीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

कारमधील सर्व प्रवासी या अपघातात मृत्युमुखी पडले. ते तामिळनाडूतील विद्यार्थी असल्याचे सांगितले. जात आहे. घटनास्थळी डिंडीगुल येथील पीएसएनए इंजिनिअरिंग कॉलेजच्या एका विद्यार्थ्याचे ओळखपत्र आढळून आले आहे. त्यामुळे मृतांची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलिस तसेच अग्निशमन आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. कार पूर्णपणे चिरडली गेल्याने बचावकार्य मोठ्या आव्हानात्मक परिस्थितीत करावे लागले. दोन जखमींना कारमधून बाहेर काढण्यासाठी वाहनाचा पत्रा कापण्यात आला.

अपघातातील मृतदेह त्रिशूर मेडिकल कॉलेजच्या शवागारात नेण्यात आले आहेत. या भीषण दुर्घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

गणपतीपुळ्याचा समुद्रकिनारा पुन्हा बंद; समुद्र खवळल्याने प्रशासनाचा निर्णय

Next

जगाचा नकाशा बदलणार? आफ्रिका मोठा, युरोप-उत्तर अमेरिका लहान दिसणार!

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech