
आंतरराष्ट्रीय मंचावर फोटो वाद; एकनाथ शिंदेंची तीव्र प्रतिक्रिया
सप्टेंबर 2, 2026 1 Min Read

किर्गिझस्तानमध्ये झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) परिषदेत पाकिस्तानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो क्रॉप केल्याच्या प्रकारावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. या घटनेनंतर भारतात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कृत्यावर संताप व्यक्त केला आहे.
“पाकिस्तानचे हे कृत्य दुर्दैवी आहे. मोदींनी मनात आणलं तर ते पाकिस्तानला जगाच्या नकाशावरून हटवू शकतात,” असे शिंदे यांनी एएनआयशी बोलताना म्हटले आहे.
दरम्यान, या घटनेनंतर सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली असून पाकिस्तानच्या या कृतीवर टीका होत आहे. आंतरराष्ट्रीय मंचावर घडलेल्या या प्रकारामुळे दोन्ही देशांतील राजकीय वातावरण पुन्हा तापल्याचे दिसत आहे.







