

रत्नागिरी – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बस प्रवासात सवलतींचा लाभ घेण्यासाठी १ सप्टेंबर २०२६ पासून एनसीएमसी (NCMC) स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात आले. रत्नागिरी आगारामध्ये स्मार्ट कार्ड काढण्यासाठी लांबचलांब रांगा लागल्याच्या दिसून आल्या. तालुक्यातील गावागावातील लोक सकाळी ६ वाजल्यापासून उपस्थित होते. लहान मुलांना घेऊन नागरिक तसेच वयोवृद्ध ही मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र तासनतास रांगेत ताटकळत उभे राहावे लागत असल्याने नागरिक त्रासून गेले होते. यावर एसटी महामंडळाने योग्य प्रकारे नियोजन करावे, अशी मागणी यावेळी उपस्थितांकडून करण्यात आली.






