Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
मुकुल माधव विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा; कराटे स्पर्धेत विद्यार्थ्यांची ९ पदकांना गवसणी!
रत्नागिरीत ‘स्वदर्पण’ केंद्राच्या माध्यमातून मानसिक आरोग्याला नवी दिशा!
जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या बॉलवर जिल्हाधिकाऱ्यांचा ‘चौकार’
रत्नागिरीच्या समुद्रात युवाशौर्याचा जागर
नांदिवडे गॅस टर्मिनलच्या स्थलांतरासाठी ३० ऑक्टोबरची डेडलाइन; ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा
आरोपांमागचा खरा सूत्रधार कोण? उदय सामंतांच्या विधानाने चर्चेला उधाण
परिसरातील चालू घडामोडी

रत्नागिरीत ‘स्वदर्पण’ केंद्राच्या माध्यमातून मानसिक आरोग्याला नवी दिशा!

ऑक्टोबर 24, 2026 2 Min Read

रत्नागिरी : मानसिक आरोग्य जपणे, स्वतःच्या भावना समजून घेणे आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्यासाठी मार्गदर्शन मिळणे, ही काळाची गरज बनली आहे. याच उद्देशाने रत्नागिरीत मानसशास्त्रज्ञ स्वामिनी रवींद्र चव्हाण यांनी ‘स्वदर्पण – अंतर्मनाचा आरसा’ या समुपदेशन, सायकोथेरपी आणि मानसशास्त्रीय मूल्यांकन केंद्राची स्थापना केली आहे.

स्वामिनी चव्हाण यांच्या आई-वडिलांच्या हस्ते केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. रत्नागिरीतील प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शाश्वत शेरे, डॉ. श्री. व सौ. कल्पना सुधांशू मेहता, श्री. व सौ. मालती गणेश खवळे आणि श्री. तुकाराम चिखलकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तर सुप्रियांतो खवळे यांच्या हस्ते थेरपी रूमचे उद्घाटन झाले.

मानसिक स्वास्थ्यासाठी विविध सुविधा

‘स्वदर्पण’ केंद्रामध्ये समुपदेशन, ताणतणाव व नैराश्य व्यवस्थापन, सायकोथेरपी, करिअर मूल्यांकन, बुद्ध्यांक चाचणी (IQ Testing) आणि मानसिक आरोग्यविषयक कार्यशाळा अशा सुविधा उपलब्ध असणार आहेत. व्यक्तींना स्वतःचे विचार, भावना आणि वर्तन समजून घेण्यासाठी मदत करणे, तसेच मानसिक स्वास्थ्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे.

मान्यवरांकडून उपक्रमाचे स्वागत

या कार्यक्रमाला डॉ. श्री. व सौ. ज्योत्स्ना अतुल देशपांडे, डॉ. विजय सूर्यगंध, डॉ. अतुल ढगे, डॉ. स्नेहल अंधारे, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य मकरंद साखळकर, उद्योजक राजेश शेट्ये, आर्किटेक्ट संजना शेट्ये, फिशरीज कॉलेजचे माजी डीन आशिष मोहिते, प्रा. स्वप्नजा मोहिते, डॉ. इंद्रनील जोशी, रत्नागिरीच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या अधिव्याख्याता दीपा सावंत, जागर नेटवर्कच्या चॅनेल हेड विभा कदम, रत्नागिरी तालुका विज्ञान मंडळाच्या उपाध्यक्षा संघमित्रा कुरतडकर, सचिव इम्तियाज सिद्दिकी, खजिनदार अभिजीत जोशी आणि सदस्या कविता ठाकरे यांच्यासह शिक्षक, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती आणि शुभचिंतकांनीही या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

 मानसिक स्वास्थ्य आणि आनंदी जीवनासाठी ‘स्वदर्पण’ केंद्र महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या बॉलवर जिल्हाधिकाऱ्यांचा ‘चौकार’

Next

मुकुल माधव विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा; कराटे स्पर्धेत विद्यार्थ्यांची ९ पदकांना गवसणी!

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech