Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
मुकुल माधव विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा; कराटे स्पर्धेत विद्यार्थ्यांची ९ पदकांना गवसणी!
रत्नागिरीत ‘स्वदर्पण’ केंद्राच्या माध्यमातून मानसिक आरोग्याला नवी दिशा!
जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या बॉलवर जिल्हाधिकाऱ्यांचा ‘चौकार’
रत्नागिरीच्या समुद्रात युवाशौर्याचा जागर
नांदिवडे गॅस टर्मिनलच्या स्थलांतरासाठी ३० ऑक्टोबरची डेडलाइन; ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा
आरोपांमागचा खरा सूत्रधार कोण? उदय सामंतांच्या विधानाने चर्चेला उधाण
परिसरातील चालू घडामोडी

पाणीटंचाई आराखडा तातडीने सादर करा; एकही गाव, वाडी वंचित राहू नये – जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश

ऑक्टोबर 12, 2026 2 Min Read

 रत्नागिरी : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सर्व गावांचे सर्वेक्षण करून पाणीटंचाई आराखडा तातडीने तयार करावा आणि तो विनाविलंब सादर करावा. नियोजन करताना जिल्ह्यातील एकही टंचाईग्रस्त गाव किंवा वाडी उपाययोजनांपासून वंचित राहणार नाही याची काटेकोर दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले.

    जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात चालू वर्षातील कमी पर्जन्यमानामुळे उद्भवणाऱ्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई आराखड्याबाबत आढावा बैठक झाली. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता अनिरुद्ध जोशी, उपकार्यकारी अभियंता स्नेहल माईणकर, कार्यकारी अभियंता विवेक सोनार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे ए. ए. कांबळे, वरिष्ठ भूवैज्ञानिक संतोष गोंधळी, तहसीलदार राजाराम म्हात्रे आदी उपस्थित होते.

टंचाईचे अचूक नियोजन व जलस्रोतांचे मॅपिंग करा

जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी तालुकानिहाय पाणीटंचाईच्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत ज्या गावांमध्ये टंचाई भासण्याची शक्यता आहे, त्यांची माहिती घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात. तसेच डिसेंबरनंतर संभाव्य टंचाई निर्माण होणाऱ्या गावांसाठीही आत्तापासूनच पूर्वतयारी सुरू करावी. सर्व तहसीलदारांनी रोजगार हमी योजनेच्या अनुषंगाने आवश्यक आराखडा सादर करावा, तसेच भूजल अधिनियमानुसार जलस्रोतांचे मॅपिंग करून त्याचा स्वतंत्र अहवाल शुक्रवारपर्यंत सादर करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

दुष्काळी पंचनाम्यांत दिरंगाई नको; यादी ग्रामपंचायतीत ठेवा

दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने सुरू असलेल्या पंचनाम्यांच्या कामाचा आढावा घेताना जिल्हाधिकारी म्हणाले, शासनाला आवश्यक आकडेवारी वेळेत सादर करायची असल्याने या कामाची गती वाढवून ते प्राधान्याने व गांभीर्यपूर्वक पूर्ण करावे. या प्रक्रियेत एकही शेतकरी वंचित राहू नये आणि कोणतीही त्रुटी राहणार नाही याची खात्री करून अहवाल प्रमाणित स्वरूपात सादर करावा. पारदर्शकता राहावी यासाठी पंचनाम्यांची यादी ग्रामपंचायतीत ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी ‘जलजीवन मिशन’, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आणि लघु पाटबंधारे विभागाच्या विविध विकासकामांचाही सविस्तर आढावा घेतला.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

सफाई कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्राधान्याने द्यावा – राज्य सफाई कर्मचारी आयोग अध्यक्ष शेरसिंग डागोर

Next

जिल्ह्यात २६ ऑक्टोबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू; अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांचे आदेश

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech