Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
मुकुल माधव विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा; कराटे स्पर्धेत विद्यार्थ्यांची ९ पदकांना गवसणी!
रत्नागिरीत ‘स्वदर्पण’ केंद्राच्या माध्यमातून मानसिक आरोग्याला नवी दिशा!
जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या बॉलवर जिल्हाधिकाऱ्यांचा ‘चौकार’
रत्नागिरीच्या समुद्रात युवाशौर्याचा जागर
नांदिवडे गॅस टर्मिनलच्या स्थलांतरासाठी ३० ऑक्टोबरची डेडलाइन; ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा
आरोपांमागचा खरा सूत्रधार कोण? उदय सामंतांच्या विधानाने चर्चेला उधाण
परिसरातील चालू घडामोडी

सफाई कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्राधान्याने द्यावा – राज्य सफाई कर्मचारी आयोग अध्यक्ष शेरसिंग डागोर

ऑक्टोबर 8, 2026 2 Min Read

 रत्नागिरी : सफाई कामगारांना मालकी हक्कांनी निवास देणे, त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती देणे, सायकल देणे, वेळेवर निवृत्ती वेतन सुरु करणे, समाजगृह देणे यासारख्या केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ द्यावा, येत्या 3 महिन्यात याची अंमलबजावणी करावी, असे निर्देश महाराष्ट्र  राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज हाताने मैला उचलणाऱ्या सफाई  कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन करणे बाबतच्या अधिनियम 2013 ची अंमलबजावणीबाबत तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या व अडीअडचणी निवारणाकरिता केलेल्या उपाययोजना संदर्भात आढावा बैठक झाली.  या बैठकीला जिल्हाधिकारी मनुज जिंदल,  जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शीतल सोनटक्के, जिल्हा प्रशासन अधिकारी वैभव गारवे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये आदी उपस्थित होते.

अध्यक्ष श्री. डागोर यांनी सर्वप्रथम सफाई कामगारांची एकूण पदे, रिक्त पदे, भरलेली पदे, कंत्राटी आणि नियमित पदे याबाबत सविस्तर माहिती घेतली. सफाई कामगारांसाठी 19 ऑगस्ट 1987, 22 ऑक्टोबर  2008, 1975 चा लाड पागे शासन निर्णयाबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, सफाई कामगारांच्या वारसांना 30 दिवसात नियुक्ती देण्याचा शासन निर्णय आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. सर्वच विभागाने मानवतावादी दृष्टीकोण ठेवून सफाई कामगारांचे आरोग्य तसेच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत. आयटीआय, विश्वनगर येथील निवासस्थाने मालकी हक्काने सफाई कामगारांना द्यावीत.

त्यांच्या आरोग्यासाठी विशेष शिबीरांचे आयोजन करावे. या शिबीरात आयुष्यमान कार्ड सारख्या सुविधा द्याव्यात.  त्यांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती अर्ज भरुन घ्यावेत. स्वयंरोजगाराच्या योजना राबवा. कोरोनाच्या काळात सफाई कामगार जीव धोक्यात घालून समाजासाठी काम करत होते. आजही त्यांनी आपले सफाईची काम बंद केले तर समाजाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. या सर्वाचा विचार करुन त्यांना त्यांचे लाभ प्राधान्याने मिळवून द्यावेत.

जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी सांगितले की, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांना नोडल अधिकारी बनवून पूर्ण जिल्ह्यातील सफाई कर्मचाऱ्यांची यादी बनविली जाईल.  त्यासाठी विविध विभागांची बैठक घेतली जाईल. त्यांच्यासाठी शिबीर घेऊन त्यांचे प्रश्न निश्चितपणाने मार्गी लावू.

चांदेराई प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचर या पदावर तन्वी काशिनाथ कांबळे हिला श्री. डागोर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

चला शाळेत जाऊया अभियान ; अंमलबजावणी बैठक

Next

पाणीटंचाई आराखडा तातडीने सादर करा; एकही गाव, वाडी वंचित राहू नये – जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech