Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
मुकुल माधव विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा; कराटे स्पर्धेत विद्यार्थ्यांची ९ पदकांना गवसणी!
रत्नागिरीत ‘स्वदर्पण’ केंद्राच्या माध्यमातून मानसिक आरोग्याला नवी दिशा!
जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या बॉलवर जिल्हाधिकाऱ्यांचा ‘चौकार’
रत्नागिरीच्या समुद्रात युवाशौर्याचा जागर
नांदिवडे गॅस टर्मिनलच्या स्थलांतरासाठी ३० ऑक्टोबरची डेडलाइन; ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा
आरोपांमागचा खरा सूत्रधार कोण? उदय सामंतांच्या विधानाने चर्चेला उधाण
परिसरातील चालू घडामोडी

रत्नागिरीच्या शिक्षणाला नवी उभारी!

सप्टेंबर 25, 2026 2 Min Read

रत्नागिरी : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा आता नव्या ऊर्जेने गजबजणार आहेत. ‘पवित्र पोर्टल’द्वारे निवड झालेल्या प्राथमिक व पदवीधर अशा तब्बल ४३६ नवनियुक्त शिक्षकांचा समुपदेशन व पदस्थापना आदेश वाटप सोहळा जिल्हा परिषदेत मोठ्या उत्साहात, नियोजनबद्ध आणि अत्यंत पारदर्शक वातावरणात काल पार पडला. प्रशासनाची तत्परता आणि अचूक नियोजनामुळे समुपदेशन पूर्ण होताच एकाच दिवशी हातात थेट नियुक्ती आदेश मिळाल्याने नवनियुक्त शिक्षकांमध्ये आनंदाचे भरते आले होते.

    या समुपदेशन प्रक्रियेत केवळ नियमांवर बोट न ठेवता जिल्हा प्रशासनाचा संवेदनशील चेहरा प्रकर्षाने दिसून आला. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी स्वतः पुढाकार घेत आजारपण, शारीरिक व्याधी असणाऱ्या उमेदवारांची आस्थेने विचारपूस केली. अशा उमेदवारांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये म्हणून त्यांनी स्वतः जातीने मार्गदर्शन करत त्यांना प्रवासासाठी व आरोग्यासाठी सोयीची शाळा निवडण्यास मोलाची मदत केली. प्रशासनाच्या या माणुसकीच्या भूमिकेने उपस्थितांचे डोळे पाणावले आणि सर्वांनी त्यांच्या संवेदनशीलतेचे भरभरून कौतुक केले.

पारदर्शकता आणि संवेदनशीलतेचा संगम

   या समुपदेशनात २०८ उपशिक्षक आणि २२८ पदवीधर शिक्षकांना मेरिटनुसार थेट शाळा निवडीचा हक्क देण्यात आला. दिव्यांग बांधव, आजारी उमेदवार आणि महिला शिक्षकांच्या सोयीचा अत्यंत सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात आला. शाळा निवडताना कोणावरही घाईगडबड न करता प्रत्येकाला पुरेसा वेळ आणि योग्य मार्गदर्शन दिले गेले. त्यामुळे सर्व उमेदवार अत्यंत समाधानाने आपल्या शाळा निवडून आनंदाने रुजू होण्यासाठी सज्ज झाले.

जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेला मिळणार गती

   कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अस्मिता केंद्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर, कृषी सभापती महेश नाटेकर तसेच जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर गोलांबडे व रेवती पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. “या नव्या आणि उत्साही शिक्षकांच्या आगमनामुळे जिल्ह्यातील शाळांमधील शिक्षकांची उणीव भरून निघेल आणि कोकणातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला नवी झळाळी मिळेल,” असा ठाम विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

प्रशासकीय पथकाचे अचूक नियोजन

   हा संपूर्ण उपक्रम वेळेत, सुरळीत आणि विनाअडथळा पार पाडण्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीषा जगदाळे, योजना शिक्षणाधिकारी किरण लोहार, माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक मेंगणे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी व शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

   हातात मानाचा नियुक्ती आदेश आणि मनात ज्ञानदानाची नवी उमेद घेऊन हे ४३६ शिलेदार आता रत्नागिरीच्या कानाकोपऱ्यातील शाळांवर रुजू होण्यासाठी रवाना झाले आहेत.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

‘लोकसंवाद २०२६’ कार्यक्रमात चिपळूणमध्ये कृषी योजनांबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन

Next

विकास प्रकल्प की प्रदूषण संकट?

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech