Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
मुकुल माधव विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा; कराटे स्पर्धेत विद्यार्थ्यांची ९ पदकांना गवसणी!
रत्नागिरीत ‘स्वदर्पण’ केंद्राच्या माध्यमातून मानसिक आरोग्याला नवी दिशा!
जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या बॉलवर जिल्हाधिकाऱ्यांचा ‘चौकार’
रत्नागिरीच्या समुद्रात युवाशौर्याचा जागर
नांदिवडे गॅस टर्मिनलच्या स्थलांतरासाठी ३० ऑक्टोबरची डेडलाइन; ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा
आरोपांमागचा खरा सूत्रधार कोण? उदय सामंतांच्या विधानाने चर्चेला उधाण
परिसरातील चालू घडामोडी

‘लोकसंवाद २०२६’ कार्यक्रमात चिपळूणमध्ये कृषी योजनांबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन

सप्टेंबर 23, 2026 2 Min Read

रत्नागिरी :- २२ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेनुसार शासनाच्यावतीने २ ऑक्टोबर रोजी महिला शेतकरी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. शेती, फळबाग, भाजीपाला, शेळीपालन, दुग्धव्यवसाय किंवा कुक्कुटपालन यांसारख्या क्षेत्रांत कार्यरत असलेल्या महिलांनी कृषी विभागाच्या संकेतस्थळावर आधार क्रमांकाद्वारे नोंदणी करून महिला शेतकरी ओळखपत्र/प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. हे ओळखपत्र असल्यास शासकीय योजना, अवजारे वाटप आणि पीक विमा यांसारख्या लाभांमध्ये महिलांना प्रथम प्राधान्य दिले जाईल, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी शत्रुघ्न म्हेत्रे यांनी केले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयांतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने चिपळूण नगर परिषद कर्मचारीवृंद गणेशोत्सव मंडळात आयोजित ‘लोकसंवाद – २०२६’ उपक्रमात ते बोलत होते. मुख्याधिकारी संजय जाधव, उपमुख्य अधिकारी प्रमोद ठसाळे व मंगेश पेढाबंकर, रचना सहाय्यक नम्रता खैरमोडे, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते, स्वच्छता निरीक्षक सुजित जाधव, अभिलेखपाल वलीत वांगडे, समूह संघटक प्रज्ञा गमरे शहरातील बचत गटातील महिला भगिनी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

कृषी योजनांचे मार्गदर्शन करताना श्री म्हेत्रे म्हणाले, संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केलेल्या महिला शेतकरी वर्षाच्या पार्श्वभूमीवर शेती व पूरक व्यवसायांमध्ये महिलांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. शेती, फळबाग, भाजीपाला, शेळीपालन, दुग्धव्यवसाय किंवा कुक्कुटपालन यांसारख्या क्षेत्रांत कार्यरत असलेल्या महिलांनी कृषी विभागाच्या संकेतस्थळावर आधार क्रमांकाद्वारे नोंदणी करून महिला शेतकरी ओळखपत्र/प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. हे ओळखपत्र असल्यास शासकीय योजना, अवजारे वाटप आणि पीक विमा यांसारख्या लाभांमध्ये महिलांना प्रथम प्राधान्य दिले जाईल.

यासोबतच त्यांनी ‘स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजने’ची सविस्तर माहिती दिली. शेतकाम करताना किंवा इतर अपघाती कारणांमुळे (उदा. वीज पडणे, सर्पदंश, विंचूदंश, विहिरीत पडून मृत्यू, रस्ता किंवा रेल्वे अपघात) शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास वारसदारांना शासनाकडून २ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाते. या योजनेचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी विभाग कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अनेक योजनांसाठी सातबारा व फार्मर आयडी आवश्यक असतो. मात्र, ज्या महिलांकडे स्वतःच्या नावावर शेतजमीन किंवा सातबारा उपलब्ध नाही, त्यांच्यासाठीही कृषी व संबंधित विभागांमार्फत स्वतंत्र योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी महिलांनी पुढे यावे व नोंदणी प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाला संबंधित विभागाचे अधिकारी, मान्यवर आणि परिसरातील महिला वर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

रत्नागिरीत ‘मिशन प्रबोधन’चा शुभारंभ; पोलिसांचा थेट नागरिकांशी संवाद

Next

रत्नागिरीच्या शिक्षणाला नवी उभारी!

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech