
करबुडे हायवे परिसरात बेकायदेशीर गोवंश कत्तल उघड; दोन आरोपी ताब्यात
सप्टेंबर 3, 2026 1 Min Read

रत्नागिरी : फणसवळे–वेतोशी गावच्या जंगलात सुरू असलेल्या बेकायदेशीर गोवंश कत्तलीचा प्रकार रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणला. मध्यरात्री सापळा रचून पोलिसांनी कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले, तर एक संशयित फरार आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळी धाड टाकण्यात आली. कारवाईदरम्यान एका आरोपीने पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी धैर्याने त्याला पकडले. दुसऱ्या आरोपीला सकाळी ताब्यात घेण्यात आले.
तपासात आरोपी बेवारस जनावरे जंगलात आणून त्यांची कत्तल करत असल्याचे समोर आले असून घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणावर मांस व साहित्य जप्त करण्यात आले आहे.
या प्रकरणी पुढील तपास सुरू असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.







