Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
गौरी व ७ दिवसांच्या गणपती विसर्जनानिमित्त मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना १९ व २० सप्टेंबरला बंदी
मंडणगड बसस्थानकाच्या नव्या इमारतीमुळे प्रवाशांची गैरसोय दूर होणार: गृह राज्यमंत्री योगेश कदम
मुंबई-गोवा महामार्गावर प्रवाशांचे हालच हाल
NCMC कार्ड योजनेत शिथिलता; प्रवाशांना दिलासा
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेवर ‘जिल्हा सनियंत्रण समिती’ची करडी नजर
गणेशोत्सवात आरोग्य शिबिरांचे आयोजन करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल
परिसरातील चालू घडामोडी

जिल्ह्यातील सर्व ८४९ ग्रामपंचायतींमध्ये एकाच दिवशी ‘महाजनजागृती मोहीम’

ऑगस्ट 27, 2026 2 Min Read

रत्नागिरी – सायबर फसवणुकीच्या वाढत्या जाळ्याला सुरुंग लावण्यासाठी आणि जिल्ह्यातील सायबर गुन्ह्यांचे प्रमाण ‘शून्य’ करण्यासाठी जिल्ह्यात एकाच दिवशी सर्व ८४९ ग्रामपंचायतींमध्ये भव्य ‘महाजनजागृती मोहीम’ राबवली जाणार आहे. पोलीस, बँक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी थेट गावागावांत जाऊन महिला व ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षिततेचे धडे द्यावेत, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज दिले.

    जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या धोक्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, सायबर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक स्मिता सुतार, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दर्श न कानसे  यांच्यासह प्रमुख बँक अधिकारी उपस्थित होते.

    पोलीस अधीक्षक श्री.बगाटे यांनी सादरीकरणाद्वारे सायबर गुन्हेगारांच्या अत्यंत क्लिष्ट आणि हायटेक कार्यपद्धतीचा पर्दाफाश केला. नुकत्याच घडलेल्या एका गुन्ह्यात गुन्हेगारांनी ८७ लाख रुपयांची रक्कम अवघ्या दोन मिनिटांत मुंबई आणि तामिळनाडूच्या खात्यांमार्फत तब्बल १४०० विविध खात्यांमध्ये वळती केली. अशा गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी सामान्य नागरिकांचे सतर्क असणे हाच सर्वात मोठा उपाय असल्याचे त्यांनी नमूद केले.

पालकमंत्र्यांचे बँकांना महत्त्वाचे निर्देश

 * सायबर विमा बंधनकारक करा: तंत्रज्ञानाशी फारसे परिचित नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांची आयुष्यभराची पुंजी सुरक्षित ठेवण्यासाठी बँकांनी त्यांच्या खात्यांचा सायबर विमा उतरवावा.

 * संशयास्पद व्यवहारांवर ‘रेड अलर्ट’: कोणत्याही खात्यातून अचानक मोठी रक्कम ट्रान्सफर होत असल्यास बँकेने तत्काळ खातेदार आणि पोलिसांना अलर्ट करावे.

 * डेटा सुरक्षेची जबाबदारी: खातेदारांची वैयक्तिक आणि गोपनीय माहिती बँकेतून बाहेर फुटणार नाही याची संपूर्ण खबरदारी बँकांनी घ्यावी.

 * तपास यंत्रणांना जलद सहकार्य: सायबर गुन्ह्यांच्या तपासात बँकांनी पोलिसांना विनाविलंब माहिती व तांत्रिक सहकार्य उपलब्ध करून द्यावे.

सायबर भामट्यांविरोधातील ही लढाई आता केवळ पोलिसांपुरती मर्यादित न राहता लोकचळवळ बनली पाहिजे, असेही पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

गणेशगुळेत साकारताहेत ‘इको फ्रेंडली’ गणपती!

Next

नेपाळमध्ये पूरस्थिती गंभीर; तिबेटमधील धरण फुटल्याने हाय अलर्ट

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech