Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
गौरी व ७ दिवसांच्या गणपती विसर्जनानिमित्त मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना १९ व २० सप्टेंबरला बंदी
मंडणगड बसस्थानकाच्या नव्या इमारतीमुळे प्रवाशांची गैरसोय दूर होणार: गृह राज्यमंत्री योगेश कदम
मुंबई-गोवा महामार्गावर प्रवाशांचे हालच हाल
NCMC कार्ड योजनेत शिथिलता; प्रवाशांना दिलासा
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेवर ‘जिल्हा सनियंत्रण समिती’ची करडी नजर
गणेशोत्सवात आरोग्य शिबिरांचे आयोजन करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल
परिसरातील चालू घडामोडी

रत्नागिरीत उपविभागीय अधिकारीपदी हरियाणाच्या IPS आरांशा यादव यांची नियुक्ती

ऑगस्ट 27, 2026 1 Min Read

रत्नागिरी : जिल्ह्यातील प्रशासकीय पातळीवर महत्त्वाचे बदल करण्यात आले असून उपविभागीय अधिकारी (SDPO) निलेश माईणकर यांची पालघर येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी कोल्हापूर येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या IPS अधिकारी आरांशा यादव यांची रत्नागिरी उपविभागीय अधिकारी म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आरांशा यादव या हरियाणातील असून त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत २०२२ मध्ये ३०२वा क्रमांक मिळवत भारतीय पोलीस सेवेत (IPS) स्थान मिळवले. त्या २०२३ बॅचच्या अधिकारी असून सध्या महाराष्ट्र कॅडरमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी दिल्लीतील सेंट स्टीफन्स कॉलेजमधून इंग्रजी विषयात पदवी (B.A. Honors) पूर्ण केली असून त्यानंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (JNU) आंतरराष्ट्रीय संबंध विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.

सुरुवातीला त्यांची निवड गुजरात कॅडरसाठी झाली होती. मात्र, २०२३ बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे IPS अधिकारी अनमोल मित्तल यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांचा कॅडर बदलून महाराष्ट्रात करण्यात आला. कोल्हापूर येथे अपर पोलीस अधीक्षक (ASP) म्हणून त्यांनी काम पाहिले असून आता त्यांच्यावर रत्नागिरी उपविभागीय अधिकारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

दरम्यान, रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार सध्या थोरात यांच्याकडे प्रभारी स्वरूपात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दोन्ही महत्त्वाच्या पदांवर सध्या प्रभारी अधिकाऱ्यांकडून कामकाज सुरू आहे. या बदलांमुळे प्रशासकीय यंत्रणेत नवे नेतृत्व मिळणार असून कामकाजात गती येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

साखरेच्या दरवाढीने गोडवा कडू; क्विक कॉमर्सवर खरेदीला मर्यादा

Next

राज्य सरकारचा मोठा निर्णय; २० लाख शाळकरी विद्यार्थ्यांना होणार मोठा फायदा

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech