
लाडकी बहीण योजनेत मोठा धक्का; 92 लाख लाभार्थी अपात्र
ऑगस्ट 19, 2026 1 Min Read
लाडकी बहीण योजनेत मोठी कारवाई करण्यात आली असून तब्बल 92 लाख अपात्र लाभार्थ्यांची नावे वगळण्यात आली आहेत. लाभार्थ्यांची सखोल छाननी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून त्यामुळे सरकारी तिजोरीवरील आर्थिक भार कमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
RTI मधून समोर आलेल्या माहितीनुसार, काही शासकीय कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनीही नियमांचे उल्लंघन करून योजनेचा लाभ घेतल्याचे आरोप आहेत. त्यामुळे आता लाभार्थ्यांची आधार क्रमांक, उत्पन्न आणि शासकीय नोंदींच्या आधारे पुन्हा तपासणी सुरू आहे. अपात्र लाभार्थ्यांवर पुढील कारवाई आणि वसुली होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.







