Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
गौरी व ७ दिवसांच्या गणपती विसर्जनानिमित्त मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना १९ व २० सप्टेंबरला बंदी
मंडणगड बसस्थानकाच्या नव्या इमारतीमुळे प्रवाशांची गैरसोय दूर होणार: गृह राज्यमंत्री योगेश कदम
मुंबई-गोवा महामार्गावर प्रवाशांचे हालच हाल
NCMC कार्ड योजनेत शिथिलता; प्रवाशांना दिलासा
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेवर ‘जिल्हा सनियंत्रण समिती’ची करडी नजर
गणेशोत्सवात आरोग्य शिबिरांचे आयोजन करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल
परिसरातील चालू घडामोडी

Blinkit वर FDAची कारवाई; मालाडमधील परवाना निलंबित

ऑगस्ट 11, 2026 1 Min Read

मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर राबवलेल्या विशेष मोहिमेदरम्यान Blink Commerce Private Limited (Blinkit)च्या मालाड पश्चिम येथील आस्थापनात गंभीर त्रुटी आढळून आल्याने कंपनीचा अन्न परवाना तत्काळ निलंबित करण्यात आला आहे. 7 ते 9 ऑगस्टदरम्यान ही मोहीम राबवण्यात आली होती.
दूध व दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल, मसाले, बेकरी उत्पादने, बाटलीबंद पाणी तसेच प्रतिबंधित पान मसाला आणि गुटख्याच्या विक्रीविरोधात FDAने ही कारवाई केली. तपासणीदरम्यान संबंधित आस्थापनात अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याने परवाना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
परवाना निलंबित केल्यानंतर संबंधित आस्थापनाला कोणत्याही प्रकारचा अन्न व्यवसाय सुरू ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. निलंबनाच्या कालावधीत अन्नपदार्थांची साठवणूक, विक्री किंवा वितरण करता येणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
FDAच्या माहितीनुसार, अन्न व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक आस्थापनाकडे वैध अन्न परवाना किंवा नोंदणी असणे बंधनकारक आहे. अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, 2006 अंतर्गत स्वच्छता, साठवणूक आणि अन्नाच्या गुणवत्तेबाबतचे नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास नोटीस, माल जप्ती, परवाना निलंबन किंवा इतर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.
या कारवाईमुळे ऑनलाइन किराणा व खाद्यपदार्थ वितरण करणाऱ्या कंपन्यांच्या अन्न सुरक्षा नियमांच्या पालनाबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्नपदार्थांची गुणवत्ता व सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी FDAकडून अशा मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, ग्राहकांनी अन्नपदार्थ खरेदी करताना पॅकेजिंग, उत्पादन व वापराची अंतिम तारीख, तसेच लेबलवरील माहिती तपासण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

महाराष्ट्रात दुधाचे दर वाढले; आजपासून नवीन दर लागू

Next

डॉल्फिन चक्रीवादळाचा परिणाम; महाराष्ट्रात पावसाला ब्रेक, १५ ऑगस्टनंतर पुन्हा सक्रियतेचा अंदाज

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech