Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
जेट्टी-पोचरस्त्यांना गती; १७० कोटींचा निधी
गौरी व ७ दिवसांच्या गणपती विसर्जनानिमित्त मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना १९ व २० सप्टेंबरला बंदी
मंडणगड बसस्थानकाच्या नव्या इमारतीमुळे प्रवाशांची गैरसोय दूर होणार: गृह राज्यमंत्री योगेश कदम
मुंबई-गोवा महामार्गावर प्रवाशांचे हालच हाल
NCMC कार्ड योजनेत शिथिलता; प्रवाशांना दिलासा
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेवर ‘जिल्हा सनियंत्रण समिती’ची करडी नजर
परिसरातील चालू घडामोडी

खरीप 2026 पिकस्पर्धा जाहीर; शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्जाचे आवाहन

जुलै 31, 2026 1 Min Read

राज्यातील अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या उत्पादनवाढीसाठी खरीप हंगाम 2026 साठी पिकस्पर्धा जाहीर करण्यात आली असून, शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

यंदापासून पिकस्पर्धेची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. यापूर्वी ही प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबवली जात होती. या उपक्रमातून प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे आणि राज्याच्या एकूण उत्पादनात भर घालणे हा उद्देश आहे.

या स्पर्धेत खरीप हंगामातील भात आणि नाचणी (रागी) या पिकांचा समावेश करण्यात आला आहे. स्पर्धा तालुका, जिल्हा आणि राज्य अशा तीन स्तरांवर घेण्यात येणार असून, सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांचा सहभाग अपेक्षित आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व त्या जमिनीवर किमान क्षेत्रात सलग लागवड केलेली असणे आवश्यक आहे. अर्जासाठी फार्मर आयडी, प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, बँक खात्याची माहिती तसेच आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील.

भात आणि नाचणी पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 निश्चित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी सर्वसाधारण गटासाठी 300 रुपये आणि आदिवासी गटासाठी 150 रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे.

या स्पर्धेत विजेत्या शेतकऱ्यांना तालुका स्तरावर 5 हजार, जिल्हा स्तरावर 10 हजार आणि राज्य स्तरावर 50 हजार रुपयांपर्यंत बक्षिसे देण्यात येणार आहेत.

अधिकाधिक शेतकऱ्यांनी या पिकस्पर्धेत सहभागी होण्यासाठी कृषी विभागाचे अधिकृत संकेतस्थळ येथे “पीक स्पर्धा नोंदणी” टॅबवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

CM फडणवीसांचे कार्यालय एअर इंडिया बिल्डिंगमध्ये; 200 कोटींची बचत

Next

आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी; मुसळधार पावसामुळे रस्त्याला भेगा पडल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech