Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
SIR अभियानात राज्यात प्रथम ठरलेल्या चिपळूण विधानसभा मतदार संघाच्या यशाबद्दल प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांचा सत्कार
जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत ओ’नेस्ट गुरुकुलच्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी
नाशिक जिल्ह्यात भूकंपाचा धक्का; नागरिकांत घबराट
केंद्राच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांचे 26 दिवसांचे उपोषण अखेर समाप्त
ग्रामीण जनतेच्या वेळेची अन् पैशांची बचत करण्यासाठी ‘महाराजस्व समाधान शिबीर’ – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ९ हजार १९० कोटींचा वार्षिक पत आराखडा
परिसरातील चालू घडामोडी

SIR अभियानात राज्यात प्रथम ठरलेल्या चिपळूण विधानसभा मतदार संघाच्या यशाबद्दल प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांचा सत्कार

जुलै 28, 2026 1 Min Read

   चिपळूण : विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण (SIR) अभियानात 265-चिपळूण विधानसभा मतदारसंघाने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावत 100 टक्के काम पूर्ण केल्याबद्दल मतदान नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांचा आमदार शेखर निकम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य अभियानाच्या निमित्ताने चिपळूण येथील राधाताई लाड सभागृहात आयोजित कार्यक्रमात हा सत्कार झाला. यावेळी नगराध्यक्ष उमेश सकपाळ, सभापती सूर्यकांत घेतले, उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी व विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सत्कारानंतर पत्रकारांशी बोलताना प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी या ऐतिहासिक यशाचे श्रेय चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यातील दोन्ही तहसीलदार, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, सर्व बीएलओ तसेच विविध शासकीय विभागातील अधिकारी-कर्मचारी यांना दिले. सर्वांच्या समन्वयातून आणि अहोरात्र परिश्रमातूनच हे यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

भारत निवडणूक आयोग व महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण (SIR) अभियानात 265-चिपळूण विधानसभा मतदारसंघाने 100 टक्के काम पूर्ण करून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. 30 जूनपासून बीएलओंनी घराघरांत जाऊन मतदार पडताळणी केली. चिपळूण व संगमेश्वर तालुक्यातील 336 मतदान केंद्रांवरील 2 लाख 71 हजार 433 मतदारांच्या नोंदींचे पुनरिक्षण पूर्ण करण्यात आले.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनुज जिंदल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम यशस्वी झाली. SIR प्रक्रियेत 2 लाख 45 हजार 487 मतदारांचे EF डिजिटायझेशन पूर्ण झाले असून, 8 ऑगस्टपर्यंत फेरपडताळणी, अनमॅप मतदारांचे मॅपिंग आणि त्रुटी दूर करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत ओ’नेस्ट गुरुकुलच्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech