
नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला असून त्याची तीव्रता 3.5 इतकी नोंदवण्यात आली आहे. भूकंपाची खोली सुमारे 5 किलोमीटर होती. अचानक जमीन हादरल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आणि अनेकजण घराबाहेर धावले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, कालही 2.9 तीव्रतेचा सौम्य धक्का जाणवला होता. मागील काही दिवसांत सुरगाणा तालुक्यातील बोरगाव परिसरात 3.6 तीव्रतेपर्यंतचे एकूण चार धक्के नोंदवले गेले आहेत. या सततच्या भूकंपीय हालचालींमुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Other Articles
Previous






