Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
केंद्राच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांचे 26 दिवसांचे उपोषण अखेर समाप्त
ग्रामीण जनतेच्या वेळेची अन् पैशांची बचत करण्यासाठी ‘महाराजस्व समाधान शिबीर’ – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ९ हजार १९० कोटींचा वार्षिक पत आराखडा
राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; शेतीला दिलासा
धामणसेत ‘एक झाड – एक पुस्तक’ उपक्रम; ९०० झाडांचे संवर्धन
घाटमाथ्यावर पुन्हा पावसाचा जोर; ताम्हिणीत 200 मिमी नोंद
आंतरराष्ट्रीय पडसाद

अमेरिकेत बेकायदा स्थलांतरित भारतीयांवर तीव्र कारवाई

जुलै 20, 2026 1 Min Read

अमेरिकेत वैध कागदपत्रांशिवाय वास्तव्यास असलेल्या सुमारे 18 हजार भारतीय नागरिकांवर ट्रम्प प्रशासनाने मोठी कारवाई सुरू केली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली बेकायदा स्थलांतरितांविरोधातील हद्दपारी मोहीम अधिक आक्रमक करण्यात आली असून, संबंधित भारतीयांना भारतात परत पाठविण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

याआधी अशा प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्तींना अपील करण्याची, न्यायालयात बाजू मांडण्याची किंवा वकील नियुक्त करण्याची संधी दिली जात असे. मात्र, नव्या कारवाईत अनेकांना थेट ताब्यात घेऊन डिटेन्शन सेंटरमध्ये हलवले जात असल्याचे वृत्त आहे.

ट्रम्प प्रशासनाने संपूर्ण अमेरिकेत बेकायदा वास्तव्यास असलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. विविध तपास यंत्रणा आणि इमिग्रेशन अधिकारी संयुक्तपणे छापेमारी करत असून, वैध कागदपत्रे नसलेल्या नागरिकांना ताब्यात घेतले जात आहे. त्यामुळे भारतीय समुदायात चिंता व्यक्त होत आहे.

हद्दपारी मोहिमेला गती देण्यासाठी टेक्सास आणि कॅलिफोर्निया येथे मोठी डिटेन्शन केंद्रे उभारण्यात आली आहेत. 2025 मध्ये 3,567 तर 2026 च्या जूनअखेरपर्यंत 1,076 भारतीय नागरिकांना अमेरिकेतून परत पाठवण्यात आले आहे. येत्या काळात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, इमिग्रेशन तज्ज्ञांनी अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांना आपली व्हिसा व इमिग्रेशन कागदपत्रे अद्ययावत ठेवण्याचा तसेच कोणतीही नोटीस मिळाल्यास त्वरित कायदेशीर सल्ला घेण्याचा सल्ला दिला आहे.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

भव्य ‘लिंगाचा डोंगर’ आकर्षणाचा केंद्रबिंदू

Next

राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; शेतीला दिलासा

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech