Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
केंद्राच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांचे 26 दिवसांचे उपोषण अखेर समाप्त
ग्रामीण जनतेच्या वेळेची अन् पैशांची बचत करण्यासाठी ‘महाराजस्व समाधान शिबीर’ – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ९ हजार १९० कोटींचा वार्षिक पत आराखडा
राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; शेतीला दिलासा
धामणसेत ‘एक झाड – एक पुस्तक’ उपक्रम; ९०० झाडांचे संवर्धन
घाटमाथ्यावर पुन्हा पावसाचा जोर; ताम्हिणीत 200 मिमी नोंद
परिसरातील चालू घडामोडी

चवे देवूड कातळशिल्पाची सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्याकडून पाहणी

जुलै 16, 2026 1 Min Read

रत्नागिरी :- सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी चवे देवूड येथील जागतिक महत्त्वाच्या कातळशिल्पांना (पेट्रोग्लिफ्स) भेट देऊन त्यांची सविस्तर पाहणी केली. तसेच, येथे सुरू करण्यात आलेल्या विशेष ‘सोव्हीनियर शॉप’चे (भेटवस्तू केंद्र) उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले.

   याप्रसंगी आमदार प्रमोद जठार, आमदार किरण सामंत, प्रशांत यादव, पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, निसर्गयात्री संस्थेचे सुधीर रिसबूड यांच्यासह इतर मान्यवर आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते.

६० हून अधिक खोदचित्रांचा खजिना

देवूड येथील कातळशिल्पांमध्ये तत्कालीन प्राणी जगताचे अत्यंत वैविध्यपूर्ण, तपशिलवार आणि जिवंत चित्रण पाहावयास मिळते. १५ मीटर लांब आणि १२ मीटर रुंद अशा विस्तीर्ण खडकावर पसरलेल्या या चित्र समूहामध्ये साठपेक्षा अधिक खोद चित्ररचना आहेत. यात प्रामुख्याने पुढील वैशिष्ट्ये आढळून येतात:

आक्रमक पावित्र्यातील एकशिंगी गेंडा आणि झेप घेणारे हरीण.

मार्जार कुळातील कांडेचोर सदृश रचना आणि लांब पिसारा असलेला मोर.

शरीरावरील केस उभे असलेला तरस आणि लांब व शरीराच्या वरती उचललेल्या शेपटीसह माकड.

मानवी पावलांसदृश्य चित्ररचना, प्राण्यांच्या शिंगासारख्या आकृत्या आणि काही अमूर्त चित्ररचना.

मानवी विकासाचा ऐतिहासिक ठेवा

येथील कातळशिल्पे केवळ पुरातत्वीय दृष्टिकोनातूनच नव्हे, तर कलात्मक, पर्यावरणीय व मानव विज्ञानाच्या (Anthropology) दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाची मानली जातात. ही खोदचित्रे मानवी विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील जीवनशैली, मानवाची अद्भूत निरीक्षणक्षमता आणि त्यांचे पर्यावरणाशी असलेले घट्ट नाते यांची साक्ष देतात. सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. शेलार यांनी या सर्व ऐतिहासिक चित्ररचनांची अतिशय बारकाईने पाहणी करत या ठेव्याचे जतन करण्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

जाखडी लोकनृत्य; संस्कृती, एकता आणि आनंदाचा संगम

Next

रत्नागिरीत दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी; 5 वर्षीय बालकाला नवजीवन

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech