
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस; सरासरी पर्जन्यमान 95.87 मिमी
रत्नागिरी जिल्ह्याचे एकूण सरासरी पर्जन्यमान 95.87 मिमी इतके नोंदवण्यात आले आहे. दिवसभरात एकूण 862.89 मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.
मंडणगड येथे सर्वाधिक 131.50 मिमी पाऊस झाला असून, राजापूर येथे 114.50 मिमी, गुहागर येथे 108.40 मिमी आणि दापोली येथे 103.00 मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. याशिवाय रत्नागिरी येथे 101.66 मिमी, लांजा येथे 99.00 मिमी, खेड येथे 81.42 मिमी, चिपळूण येथे 63.00 मिमी आणि संगमेश्वर येथे 60.41 मिमी पाऊस पडला.
दरम्यान, हवामान विभागाने कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे. काही ठिकाणी जोरदार पावसासह अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टी भागात सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असून, आकाश सामान्यत: ढगाळ राहील.
तसेच मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. घाट विभागात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.







