
“माझा विहान येईल…”; आईचा विश्वास आणि काळजाला भिडणारी वास्तवता
जुलै 1, 2026 1 Min Read
चेंबूर येथे मंगळवारी घडलेल्या दुर्दैवी अपघातात शाळेच्या बसवर झाड कोसळल्याने ११ वर्षीय विहान श्रीवास्तव याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या धक्क्यातून सावरणे विहानची आई जुही श्रीवास्तव यांना अत्यंत कठीण जात आहे. मुलाच्या मृत्यूला काही तास उलटून गेले असतानाही त्या अजूनही वास्तव स्विकारू शकत नाहीत. विहानची क्रिकेटची आवड लक्षात ठेवत त्या त्याची बॅट हातात घेऊन बसल्या आहेत. “माझा विहान येईल आणि खेळायला जाईल,” या आशेवर त्या अजूनही लेकराची वाट पाहत आहेत.
या हृदयद्रावक घटनेने सर्वत्र शोककळा पसरली असून नागरिकांनी प्रशासनाकडून अशा दुर्घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.







