

मुंबई-गोवा महामार्गावर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहनांची प्रचंड गर्दी असताना खराब रस्त्यांमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी सर्व्हिस रोडचा वापर करावा लागत असून तेथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
खड्ड्यांमुळे वाहतूक मंदावते, कोंडी वाढते आणि अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. पावसानंतर आता धुळीचाही त्रास वाढला असून दुचाकीस्वारांना सर्वाधिक फटका बसत आहे.
टोलमुक्तीचा निर्णय घेतला असला तरी “रस्ता खड्डेमुक्त कधी होणार?” असा संतप्त सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे.





