

महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे प्रणेते आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरी येथे त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी उप जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. तसेच वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या ‘कृषी दिना’च्या शुभेच्छा देण्यात आल्या.







