
देवगड, पूर्णगड, मेर्वी, बारसू अशा कोणत्याच जागांचा अंतिम निर्णय नाही..
जुलै 1, 2026 1 Min Read

अदानी, रिलायन्स, एनटीपीसी सोबत फक्त सामंजस्य करार
रत्नागिरी जिल्ह्यातील पूर्णगड, मेर्वी तसेच बारसू आणि देवगड येथे अणुऊर्जा प्रकल्प उभारला जाणार असल्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महत्त्वपूर्ण खुलासा करत विरोधकांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले. राज्य सरकारने अणुऊर्जा प्रकल्पासाठी अदानी समूह, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एनटीपीसी लिमिटेड यांच्यासोबत सामंजस्य करार (MoU) केले असले, तरी प्रकल्पासाठी कोणतीही जागा अद्याप निश्चित करण्यात आलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अणुऊर्जा प्रकल्पाच्या मुद्द्यावर विधानसभेत चर्चा सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना, कोणताही अंतिम निर्णय झालेला असल्याचे सांगत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांना चांगलीच चपराख दिली आहे. राज्य सरकार कोणताही निर्णय घेताना स्थानिकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देईल. तसेच पर्यावरणीय निकष, कायदेशीर प्रक्रिया आणि स्थानिकांशी सविस्तर संवाद पूर्ण झाल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले. पूर्णगड, मेर्वी, बारसू किंवा देवगड या ठिकाणांपैकी कोणत्याही ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याचा अंतिम निर्णय झालेला नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.







