Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
केंद्राच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांचे 26 दिवसांचे उपोषण अखेर समाप्त
ग्रामीण जनतेच्या वेळेची अन् पैशांची बचत करण्यासाठी ‘महाराजस्व समाधान शिबीर’ – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ९ हजार १९० कोटींचा वार्षिक पत आराखडा
राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; शेतीला दिलासा
धामणसेत ‘एक झाड – एक पुस्तक’ उपक्रम; ९०० झाडांचे संवर्धन
घाटमाथ्यावर पुन्हा पावसाचा जोर; ताम्हिणीत 200 मिमी नोंद
परिसरातील चालू घडामोडी

जेष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता काळाच्या पडद्याआड; कला विश्वात हळहळ

जुलै 1, 2026 2 Min Read

जेष्ठ रंगकर्मी, दिग्दर्शिका आणि मराठी नाट्यसृष्टीतील अजरामर व्यक्तिमत्व विजया मेहता यांचे आज वयाच्या 92 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमीने एक महान दीपस्तंभ गमावला असून कला क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
“विजया बाई” हे नाव नाट्य आणि चित्रपट सृष्टीत अत्यंत आदराने घेतले जाते. त्यांची कारकीर्द प्रदीर्घ, समृद्ध आणि तितकीच तेजस्वी राहिली. ‘रंगायन’ ही प्रायोगिक नाट्यचळवळ उभी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
त्यांच्या दिग्दर्शनाखाली अनेक गाजलेली नाटके रंगभूमीवर आली. हमीदाबाईची कोठी, वाडा चिरेबंदी, जास्वंदी, पुरुष, बॅरिस्टर, अजब न्याय वर्तुळाचा, शितू, मादी, मी जिंकलो मी हरलो, एक शून्य बाजीराव, महासागर आणि हयवदन ही नाटके आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.
चित्रपट क्षेत्रातही त्यांनी मोजके पण दर्जेदार काम केले. लक्ष्मीबाई टिळक यांच्या जीवनावर आधारित ‘स्मृतिचित्रे’ या कलाकृतीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
विक्रम गोखले, अशोक सराफ, रीमा लागू, नाना पाटेकर, अमोल पालेकर, नीना कुलकर्णी, भारती आचरेकर, सुहास जोशी यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांना त्यांनी घडवले. त्या स्वतः इब्राहिम अल्काझी आणि अदी मर्झबान यांच्या शिष्या होत्या.
दिग्दर्शन आणि अभिनयाच्या पलीकडे जाऊन त्यांनी विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या. तब्बल 14 वर्षे त्या सेन्सॉर बोर्डावर कार्यरत होत्या. 1988 साली त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे अध्यक्षपद भूषवले. तसेच 1993 ते 2010 या 17 वर्षांच्या कालावधीत एनसीपीए (राष्ट्रीय संगीत नाट्य केंद्र)च्या कार्यकारी संचालक म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
त्यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारकडून त्यांना पद्मश्री, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, विष्णुदास भावे सुवर्णपदक, मास्टर दीनानाथ पुरस्कार, कालिदास सन्मान आणि टागोर रत्न फेलोशिप असे अनेक प्रतिष्ठित सन्मान मिळाले.इचलकरंजी येथे झालेल्या 67 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. विजया मेहता या मराठी रंगभूमीसाठी कायम दीपस्तंभासारख्या उभ्या राहिल्या. आज त्यांच्या जाण्याने मराठी रंगभूमी पोरकी झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

कथा ‘उद्यानपंडित’ आंबेवाले केतकर यांची !

Next

“माझा विहान येईल…”; आईचा विश्वास आणि काळजाला भिडणारी वास्तवता

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech