
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून उद्या ‘सहकार मेळावा’चे आयोजन

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., रत्नागिरी यांच्यावतीने केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापना दिनानिमित्त ‘सहकार मेळावा’चे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मंगळवार, दि. 30 जून 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता मराठा भवन मंगल कार्यालय, माळनाका, रत्नागिरी येथे पार पडणार आहे.
सहकाराच्या माध्यमातून सहकारी संस्था सक्षमीकरण, ग्रामीण विकास आणि व्यवसाय वृद्धी या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे (अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक) भूषवणार आहेत. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार शेखर निकम, अॅड. दीपक पटवर्धन (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन), बाबाजीराव जाधव (उपाध्यक्ष, रत्नागिरी जि.म. सहकारी बँक) आणि डॉ. सोपान शिंदे (जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, रत्नागिरी) उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधिर गिम्हवणेकर यांनी केले आहे.







