Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
केंद्राच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांचे 26 दिवसांचे उपोषण अखेर समाप्त
ग्रामीण जनतेच्या वेळेची अन् पैशांची बचत करण्यासाठी ‘महाराजस्व समाधान शिबीर’ – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ९ हजार १९० कोटींचा वार्षिक पत आराखडा
राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; शेतीला दिलासा
धामणसेत ‘एक झाड – एक पुस्तक’ उपक्रम; ९०० झाडांचे संवर्धन
घाटमाथ्यावर पुन्हा पावसाचा जोर; ताम्हिणीत 200 मिमी नोंद
परिसरातील चालू घडामोडी

भिल्याचे ‘आंबेवाले केतकर’ आता ‘उद्यानपंडित’

जून 30, 2026 2 Min Read

 “शेती तोट्याची आहे”, “यात काही उरले नाही”, असा सूर आळवणाऱ्यांसाठी चिपळूण तालुक्यातील भिले येथील धनंजय केतकर यांचा कृषी प्रवास डोळे उघडणारा आहे. केवळ ४५ हापूसच्या कलमांपासून सुरू झालेला हा प्रवास आज ६ हजार कलमांच्या विशाल साम्राज्यात बदलला आहे. त्यांच्या याच अथांग मेहनतीची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने त्यांना मानाचा १ लाख रुपये, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र असे स्वरुप असणारा ‘उद्यानपंडित’ पुरस्कार दिला आहे. ‘आंबेवाले केतकर’ म्हणून प्रसिद्ध असणारे धनंजय केतकर आता ‘उद्यानपंडित’ ठरले आहेत.

      सन १९७३ मध्ये धनंजय केतकर यांच्या वडिलांनी आणि चुलत्यांनी केवळ ४५ कलमांच्या आधारावर या आंब्याच्या बागेची मुहूर्तमेढ रोवली होती. पुढच्या पिढीने हा वारसा तितक्याच निष्ठेने पुढे चालवला. चुलते, मोठे बंधू आणि संपूर्ण कुटुंबाच्या अखंड परिश्रमांतून आज भिले येथील बागेत तब्बल ६ हजार आंब्याची कलमे डोलत आहेत. यातील साडेतीन हजार कलमे सध्या व्यावसायिक उत्पादन देत आहेत. याशिवाय बागेत दीड हजार काजूची झाडे आणि १० ते १२ एकरावर भात व कडधान्याची पिकेही घेतली जातात.

केतकर यांच्या यशाचे सर्वात मोठे गमक म्हणजे त्यांनी रासायनिक खतांना पूर्णपणे फाटा दिला आहे. गांडूळ खत, शेणखत, जिवामृत आणि गोकृपामृत यांच्या जोरावर संपूर्ण शेती फुलवली जाते. व्यावसायिक दूध विक्रीसाठी नव्हे, तर घरच्या दुधासाठी आणि शेतीला सेंद्रिय खत मिळण्यासाठी त्यांनी देशी गाई व म्हशींचे पालन केले आहे. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला हा दर्जेदार आंबा कोणत्याही दलालाला न विकता थेट ग्राहकांना विकला जातो. यामुळेच ग्राहकांचा विश्वास आणि केतकरांचा नफा दोन्ही सुरक्षित राहते.

     श्री. केतकर यांनी पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेत त्यांनी गवत कापणी यंत्र, पॉवर स्प्रे, ट्रॅक्टर आणि गांडूळ खत प्रकल्प उभारले आहेत. शिवाय १०० टक्के फलोत्पादनखाली लाभ घेतला आहे. आज त्यांच्या या १२० एकर क्षेत्रावरील शेतीचा डोलारा सांभाळण्यासाठी स्थानिक आणि नेपाळी मिळून सुमारे ७० कामगारांचा ताफा अहोरात्र राबत आहे.

“गावागावांत मोफत धान्य मिळत असल्याने काहींमध्ये आळशीपणा आला आहे, शेती कशाला हवी अशी मानसिकता तयार होत आहे. पण, शेती हा आपल्या देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा आहे. शेतकरी समृद्ध झाला तरच गाव, तालुका, जिल्हा पर्यायाने राज्य आणि देश समृद्ध होईल. प्रामाणिक प्रयत्न, योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली, तर शेती आजही उत्तम आहे आणि उद्याही उत्तमच असणार आहे. शेतमालाला योग्य भाव मिळाला, तर शेतकऱ्यासारखा दुसरा कोणीही राजा नाही!” असे उद्यानपंडित धनंजय केतकर यांनी बोलताना सांगितले.

      निसर्गातील बदलांचे आव्हान झेलत कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली श्री. केतकर यांनी घेतलेली ही झेप कोकणातील इतर शेतकऱ्यांसाठी नक्कीच मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरेल. ‘आंबेवाले केतकर’ ते ‘उद्यानपंडित’ हा प्रवास कृषी क्षेत्रातील एका नव्या क्रांतीची साक्ष देणारा आहे, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते यांनी बोलताना व्यक्त केले.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

‘अहिल्यादेवी होळकर’ कर्जमुक्ती योजना; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर

Next

मुंबईत स्कूलबसवर झाड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू; 10 जखमी

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech