
मुंबईत स्कूलबसवर झाड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू; 10 जखमी
जून 30, 2026 1 Min Read

मुंबईतील चेंबूर परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेत शालेय बसवर मोठे झाड कोसळल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून 10 मुले जखमी झाली आहेत. ही घटना चेंबूर रोड क्रमांक 11 येथे घडली.
अपघातावेळी बसमध्ये एकूण 13 विद्यार्थी होते. घटनेनंतर जखमी विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, स्थानिक रहिवाशांनी या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. परिसरात यापूर्वीही अशा घटना घडल्या असल्याचा दावा करत त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेला (बीएमसी) वारंवार पत्रे देऊन धोकादायक झाडे छाटण्याची मागणी केली होती. मात्र, या सूचनांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
या घटनेमुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, जबाबदारांवर कारवाईची मागणी जोर धरत आहे.







