

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून पुढील 24 ते 48 तासांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 22 जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला असून रत्नागिरी आणि ठाणे येथे ऑरेंज अलर्ट तर उर्वरित 20 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोकण, विदर्भ, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी नदी-नाले आणि डोंगराळ भागात सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Other Articles
Next







