
पासपोर्ट नागरिकत्वाचा पुरावा नाही? MEA स्पष्टीकरणानंतर देशभर चर्चा…
जून 26, 2026 1 Min Read

परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) पासपोर्ट हा नागरिकत्वाचा अंतिम पुरावा नसून केवळ प्रवासासाठीचा दस्तऐवज असल्याचे स्पष्ट केल्यानंतर देशभरात चर्चा रंगली आहे. सरकारच्या मते, भारतात कोणतेही एकच ओळखपत्र नागरिकत्व सिद्ध करत नाही. नागरिकत्व कायदा 1955 नुसार, नागरिकत्व हे जन्म, पालकांची माहिती आणि संबंधित कागदपत्रांच्या साखळीवर आधारित असते. जन्म दाखला, शालेय कागदपत्रे, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र यांसारखी कागदपत्रे महत्त्वाची असली तरी एकट्याने ती पुरेशी नसतात, इतकेच नव्हे तर, तुमचा जन्म दाखला आणि शालेय नोंदी हेच या कायदेशीर सर्वात मजबूत आधार आहेत. म्हणूनच, तुमचे जन्म प्रमाणपत्र आणि शालेय प्रमाणपत्रे यांसारखी मूलभूत कागदपत्रे सुरक्षित ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.







