
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भव्य पक्षप्रवेश


उत्तर रत्नागिरीचे प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली हजारों कार्यकर्त्यांनी केला भाजपात पक्षप्रवेश
आज रत्नागिरी शहरातील स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर नाट्यगृहात भाजपचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात चिपळूण, खेड आणि परिसरातील उबाठा आणि राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह जिल्हाभरातील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सहदेव बेटकर यांच्यासह चिपळूण आणि खेड परिसरातील उबाठाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. उत्तर रत्नागिरीचे प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य पक्षप्रवेश यशस्वी झाल्याचं रविंद्र चव्हाण यांनी जाहीर केलं. तसेच संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासाठी आमदार प्रमोद जठार यांच्यासारखे खंदे नेतृत्व आता मिळाले आहे त्यामुळे लवकरच जिल्ह्याभरात भाजपाचे असे भव्य पक्षप्रवेश पाहायला मिळतील मात्र आपल्या स्वार्थासाठी भाजपाला रामराम ठोकणाऱ्यांना आणि महाविकास आघाडीची धुरा हाती धरणाऱ्यांना पुन्हा भाजपात प्रवेश नाही, असेही चव्हाण यांनी ठणकावून सांगितले.







