Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
केंद्राच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांचे 26 दिवसांचे उपोषण अखेर समाप्त
ग्रामीण जनतेच्या वेळेची अन् पैशांची बचत करण्यासाठी ‘महाराजस्व समाधान शिबीर’ – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ९ हजार १९० कोटींचा वार्षिक पत आराखडा
राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; शेतीला दिलासा
धामणसेत ‘एक झाड – एक पुस्तक’ उपक्रम; ९०० झाडांचे संवर्धन
घाटमाथ्यावर पुन्हा पावसाचा जोर; ताम्हिणीत 200 मिमी नोंद
परिसरातील चालू घडामोडी

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी ॲड. दीपक पटवर्धन बिनविरोध

जून 13, 2026 1 Min Read


संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील पतसंस्थांची शिखर संस्था असलेल्या राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्षपदी रत्नागिरीचे सुपुत्र व स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था मर्यादित रत्नागिरी जिल्हयाचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांची आज बिनविरोध निवड झाली. याबद्दल संपूर्ण राज्यातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.
युद्धजन्य परिस्थिती, इंधनाचे वाढते दर यामुळे अर्थविश्वासमोर एक आव्हानात्मक परिस्थिती उद्भवली आहे. यामुळे पतसंस्थांसमोर नवीन आव्हाने उभी राहत आहेत. अशा परिस्थितीत राज्यभर १९००० पतसंस्थांना योग्य असे मार्गदर्शन व नेतृत्व मिळाले आहे, असे उद्गार भारतीय रिझर्व बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी यावेळी काढले व ॲड.दीपक पटवर्धन यांचे अभिनंदन केले. यावेळी पतसंस्था फेडरेशनचे मुख्य प्रवर्तक वसंतराव शिंदे, माजी अध्यक्ष काकासाहेब कोयटे, उपाध्यक्ष डॉ.शिंगी, महासचिव राजोबा, ज्येष्ठ संचालक दादाराव तुपकर यांचेसह पतसंस्था फेडरेशनचे राज्यभरातील सर्व संचालक उपस्थित होते.
राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री ना.उदय सामंत, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.आ.रविंद्र चव्हाण, आमदार किरण सामंत, मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व आमदार प्रवीण दरेकर, सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.उदय जोशी, आमदार प्रसाद लाड यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

परशुराम क्षेत्रातील विकास प्रकल्पांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

Next

पिकअप विहिरीत कोसळून आठ भाविकांचा मृत्यू

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech