Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
केंद्राच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांचे 26 दिवसांचे उपोषण अखेर समाप्त
ग्रामीण जनतेच्या वेळेची अन् पैशांची बचत करण्यासाठी ‘महाराजस्व समाधान शिबीर’ – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ९ हजार १९० कोटींचा वार्षिक पत आराखडा
राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; शेतीला दिलासा
धामणसेत ‘एक झाड – एक पुस्तक’ उपक्रम; ९०० झाडांचे संवर्धन
घाटमाथ्यावर पुन्हा पावसाचा जोर; ताम्हिणीत 200 मिमी नोंद
परिसरातील चालू घडामोडी

परशुराम क्षेत्रातील विकास प्रकल्पांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

जून 13, 2026 2 Min Read


  श्री क्षेत्र परशुराम येथील भगवान श्री परशुराम मंदिरात रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांच्या अध्यक्षतेखाली परशुराम क्षेत्रातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक संपन्न झाली. यावेळी संस्थान श्री भार्गवराम परशुरामचे अध्यक्ष जीवन रेळेकर व विश्वस्त डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांचे स्वागत केले.
बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच महसूल विभागाच्या प्रलंबित कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मंदिर परिसरातील विकासकामे, भाविकांसाठी आवश्यक सुविधा, राष्ट्रीय महामार्गाशी संबंधित रखडलेली कामे तसेच विविध विभागांमार्फत सुरू असलेल्या प्रकल्पांचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला.
बैठकीस संस्थानचे अध्यक्ष जीवन रेळेकर, विश्वस्त डॉ. प्रशांत पटवर्धन, विश्वस्त संदीप थत्ते, सल्लागार रामचंद्र वडके, चिपळूणचे उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे, खेडच्या उपविभागीय अधिकारी सौ. वैशाली पाटील व तहसीलदार सुधीर सोनवणे, सल्लागार समीर देसाई उपस्थित होते.
बैठकीनंतर जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांनी परशुराम क्षेत्र विकास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या सांस्कृतिक भवनाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच विविध विकासकामांतील अडचणी जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी पंकज गोसावी, श्री. माडकर व सौ. जाधव, उपविभागीय वन अधिकारी सौ. गिरिजा देसाई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. कुलकर्णी, कार्यकारी अभियंता श्री. सुखदेवे तसेच उपअधीक्षक भूमी अभिलेख चिपळूण सुशांत साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संस्थान परिसरातील विविध विकासकामे, राष्ट्रीय महामार्गाशी संबंधित प्रलंबित कामे आणि विभागनिहाय अडचणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित विभागांच्या कामकाजाचा आढावा घेत जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांनी सर्व प्रलंबित कामे प्राधान्याने व निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यामुळे श्री क्षेत्र परशुराम येथील विकासकामांना अधिक गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

ग्राहकांना दिवसाला फक्त २०० लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार

Next

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी ॲड. दीपक पटवर्धन बिनविरोध

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech