Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
रत्नागिरीत मुंढे पॅटर्नचा धडाका
कॉक्रोच जनता पार्टीचा एल्गार, अभिजित दिपके यांचा आक्रमक पवित्रा
रिव्हर्स घेताना अंदाज चुकला; डंपर 35 फूट दरीत कोसळून चालकाचा मृत्यू
जगबुडी नदीच्या डोहात काळाचा घाला; तिघा भावांचा मृत्यू
अनिल मरकड यांची अखेर मृत्यूशी झुंज अपयशी
रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग’ची धडक कारवाई; ३.३३ कोटी दंड वसूल
परिसरातील चालू घडामोडी

रत्नागिरीत मुंढे पॅटर्नचा धडाका

जून 11, 2026 1 Min Read

राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची धुरा तुकाराम मुंढे यांनी स्वीकारताच राज्यभरात “मुंढे पॅटर्न”ची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यांच्या कडक आणि पारदर्शक कार्यपद्धतीमुळे प्रशासनात मोठी हालचाल दिसून येत असून, गैरप्रकार करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचेच पडसाद रत्नागिरी जिल्ह्यातही उमटले असून, अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाईला सुरुवात केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात बेकायदेशीर गुटखा आणि पानमसाला विक्रीविरोधात मोठी मोहीम राबवण्यात आली. या अंतर्गत जिल्हाभरात आठ ठिकाणी छापे टाकण्यात आले असून, ६ लाख १४ हजार ५५७ रुपयांचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सहा गुन्हे दाखल करत आठ जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
गुटखा विक्रीसोबतच हॉटेल्सवरही प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्ह्यातील सुमारे ६० हॉटेल्सची अचानक तपासणी करण्यात आली. यामध्ये स्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चार हॉटेल्सना सुधारणा नोटीस बजावण्यात आली असून, तीन प्रकरणांमध्ये २४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक नोंदणी असूनही मनुष्यबळाची तीव्र कमतरता असल्याचे चित्र आहे. सहाय्यक आयुक्त पद रिक्त असून सध्या अतिरिक्त कार्यभारावर कारभार सुरू आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या बळावर इतक्या मोठ्या जिल्ह्यात सातत्यपूर्ण कारवाई करणे आव्हानात्मक ठरत आहे. दरम्यान, या धडक कारवायांच्या पार्श्वभूमीवर पुढील काळात तपासणी आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत असून, रत्नागिरीतील बेकायदेशीर व्यवसायांवर प्रशासनाचा फास आणखी आवळला जाण्याची शक्यता आहे.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

कॉक्रोच जनता पार्टीचा एल्गार, अभिजित दिपके यांचा आक्रमक पवित्रा

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech