Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
अनिल मरकड यांची अखेर मृत्यूशी झुंज अपयशी
रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग’ची धडक कारवाई; ३.३३ कोटी दंड वसूल
कडक उन्हामुळे शाळांचे वेळापत्रक बदलले
चिपळूणच्या तन्वीची जागतिक सुवर्णभरारी
2 आठवड्यात हद्दपारीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढा -जिल्हाधिकारी मनुज जिंदल
मान्सून रेंगाळला; राज्यावर उष्णतेचे सावट
परिसरातील चालू घडामोडी

2 आठवड्यात हद्दपारीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढा -जिल्हाधिकारी मनुज जिंदल

जून 10, 2026 1 Min Read

रत्नागिरी : ज्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडून हद्दपारीची प्रकरणे प्रलंबित आहेत, पुढील 2 आठवड्यात ती निकाली काढावी, असे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले. एमआयडीसी मध्ये ज्या कारखान्यांमध्ये रसायनांचे उत्पादन होते, त्यांच्या नावांची यादी फॅक्टरी निरीक्षकांनी घ्यावी. त्याचबरोबर पोलीस अधिकाऱ्यांसाठी रसायने ओळखण्यासाठीची कार्यशाळा घ्यावी, अशी सूचना पोलीस नितीन बगाटे यांनी दिली.
नार्को को-ओर्डीनेशन यंत्रणेच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक आज झाली. बैठकीला अपर पोलीस अधिक्षक बी. बी. महामुनी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, पोलीस निरीक्षक नितीन ढेरे आदी उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक नितीन  बगाटे यांनी सर्व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. ते म्हणाले, सर्व विभागांनी कर्तव्य तसेच जबाबदारी म्हणून सक्रीय कार्यवाही करावी. एमडी बनवायला जे रसायनिक पदार्थ लागतात, ते आपल्या येथील एमआयडीसीतील कारखान्यात बनतात का, त्याबाबतची यादी तसेच वाहतूक होणाऱ्या रसायनाची माहिती द्यावी.
जिल्हाधिकारी मनुज जिंदल म्हणाले, चिपळूण हे मोठे शहर आहे. त्या परिसरात पर्यटकांची गर्दी असते. अशा ठिकाणी सतर्क राहून सर्वच अधिकाऱ्यांनी विशेषत: पोलीस अधिकाऱ्यांनी अंमली पदार्थ विरोधात कारवाई करावी. जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वतंत्रपणे व्यसनमुक्ती केंद्र सुरु करावे. प्रलंबित हद्दपाराची प्रकरणे पुढील 2 आठवड्यात निकालात काढावीत. अंमली पदार्थ विरोधात प्रत्येक विभागाने कार्यवाहीत योगदान द्यावे.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

मान्सून रेंगाळला; राज्यावर उष्णतेचे सावट

Next

चिपळूणच्या तन्वीची जागतिक सुवर्णभरारी

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech