Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
मुकुल माधव विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा; कराटे स्पर्धेत विद्यार्थ्यांची ९ पदकांना गवसणी!
रत्नागिरीत ‘स्वदर्पण’ केंद्राच्या माध्यमातून मानसिक आरोग्याला नवी दिशा!
जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या बॉलवर जिल्हाधिकाऱ्यांचा ‘चौकार’
रत्नागिरीच्या समुद्रात युवाशौर्याचा जागर
नांदिवडे गॅस टर्मिनलच्या स्थलांतरासाठी ३० ऑक्टोबरची डेडलाइन; ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा
आरोपांमागचा खरा सूत्रधार कोण? उदय सामंतांच्या विधानाने चर्चेला उधाण
परिसरातील चालू घडामोडी

नूतन भाजी मार्केट इमारतीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण

ऑक्टोबर 17, 2026 2 Min Read

रत्नागिरी : येथील बाजारपेठेतील नागरिकांच्या भावनांचा आदर करून या भाजी मार्केटला ‘श्री नवलाई देवी भाजी मंडई’ असे नाव देणे योग्य ठरेल. तसेच, येथील स्टॉलचे वाटप करताना जुन्या भाजी मंडईतील स्टॉलधारकांना विश्वासात घेऊन, अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांना लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी दिली जावी. या प्रक्रियेत जुन्या व्यावसायिकांवर आणि गरजू व्यक्तींवर कोणताही अन्याय होणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिल्या.

     नगरपरिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत बाजारपेठ हद्दीतील जुन्या भाजी मार्केटच्या नूतन इमारत बांधकामाचे लोकार्पण पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण व फित कापून करण्यात आले.

कार्यक्रमास नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, मुख्याधिकारी वैभव गारवे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, बंड्या साळवी, ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी, नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, “सुमारे ३ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या सुसज्ज इमारतीमुळे नगरपालिकेचे कामकाज अधिक सुसूत्रित होईल आणि नागरिकांना आधुनिक सोयी-सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. यामुळे शहराच्या विकासाला एक नवी दिशा मिळेल.”

पालकमंत्र्यांनी यावेळी शहराशी संबंधित विविध विकासकामांचा आढावा घेत महत्त्वाच्या सूचना दिल्या:

 *’छत्रपती शिवाजी महाराज स्टॉप’ : स्मार्ट सिटी योजनेंतर्गत बसविण्यात आलेल्या बस स्टॉप्सपैकी शिवाजीनगर येथील बस स्टॉपचे नामकरण ‘छत्रपती शिवाजी महाराज स्टॉप’ असे करण्याबाबत तत्काळ कार्यवाही करावी.

 *ट्रक टर्मिनल व वाहनांची देखभाल : शहरात नवीन ट्रक टर्मिनल सुरू करण्यात आले असून नगरपालिकेमार्फत २० नवीन वाहने उपलब्ध करून दिली जात आहेत. या वाहनांच्या व यंत्रसामग्रीच्या देखभालीसाठी स्वतंत्र सर्व्हिसिंग सेंटर उभारण्याऐवजी ट्रक टर्मिनलच्या जागेचाच वापर करावा, जेणेकरून अनावश्यक खर्च टळून नगरपालिकेच्या निधीची बचत होईल.

 *कर संकलनात वाढ : शहरातील इमारतींच्या मॅपिंगनंतर नगरपालिकेच्या कर उत्पन्नात दरवर्षी सुमारे ७.५ ते ८ कोटी रुपयांची अतिरिक्त भर पडणार आहे. हा वाढीव निधी शहराच्या विविध विकासकामांसाठीच वापरला जाईल.

 *स्वच्छता कामगारांचे हित : स्वच्छता कामगारांच्या कंत्राटाबाबत सूचना देताना, कंत्राटदाराने सर्व स्वच्छता कामगारांना वेळेवर योग्य वेतन, गणवेश आणि आवश्यक मानवी हक्क पुरवणे बंधनकारक राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

   कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. मुख्याधिकारी श्री. गारवे यांनी प्रास्ताविक केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्वा पेठे यांनी केले.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

फटाक्यांच्या उत्पादन आणि विक्रीवरही बंदी घाला! विद्यानंद बापटांची मोठी मागणी

Next

‘जागर’ परिवाराकडून दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech