Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
मुकुल माधव विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा; कराटे स्पर्धेत विद्यार्थ्यांची ९ पदकांना गवसणी!
रत्नागिरीत ‘स्वदर्पण’ केंद्राच्या माध्यमातून मानसिक आरोग्याला नवी दिशा!
जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या बॉलवर जिल्हाधिकाऱ्यांचा ‘चौकार’
रत्नागिरीच्या समुद्रात युवाशौर्याचा जागर
नांदिवडे गॅस टर्मिनलच्या स्थलांतरासाठी ३० ऑक्टोबरची डेडलाइन; ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा
आरोपांमागचा खरा सूत्रधार कोण? उदय सामंतांच्या विधानाने चर्चेला उधाण
परिसरातील चालू घडामोडी

निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात रत्नागिरीत काँग्रेसचा मूकमोर्चा

ऑक्टोबर 5, 2026 2 Min Read

 रत्नागिरी : भारतीय संविधानाने दिलेल्या मतदानाच्या मूलभूत अधिकारावर गदा आणली जात असल्याचा आरोप करत रत्नागिरीत काँग्रेस पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला. निवडणूक आयोगाच्या ‘एसआयआर’ प्रक्रियेच्या माध्यमातून मत चोरी होत असल्याचा दावा करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा किंवा त्यांना पदावरून बडतर्फ करण्यात यावे, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

     सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मूकमोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रमेश कीर, सरचिटणीस हुस्नबानू खलिफे, दक्षिण रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जमीर खलिफे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

    प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रदेश सरचिटणीस रमेश कीर म्हणाले की, “निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असली तरी सध्या तिच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. एसआयआरच्या नावाखाली गोंधळ सुरू असून, मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णयांवर त्यांच्याच सहकाऱ्यांनी वारंवार आक्षेप नोंदवूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे.” काँग्रेस नेते राहुल गांधी या मुद्द्यावर सातत्याने आवाज उठवत असल्याचे सांगत, हे निवेदन राष्ट्रपतींकडे पाठवून आयुक्तांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

     प्रदेश सरचिटणीस हुस्नबानू खलिफे यांनी २ ते ८ ऑक्टोबर दरम्यान चालणाऱ्या ‘लोकशाही बचाव आंदोलना’चा हा भाग असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी काँग्रेस पक्षाच्या तीन प्रमुख मागण्या मांडल्या ज्यात महाराष्ट्रातील मतदारांना मतदानापासून वंचित ठेवणारी ‘एसआयआर’ प्रक्रिया तातडीने रद्द करण्यात यावी. या गोंधळास जबाबदार धरून मुख्य निवडणूक आयुक्तांना बडतर्फ करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा.

पारदर्शकता जपण्यासाठी ईव्हीएम ऐवजी पूर्वीप्रमाणे बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा काँग्रेसच्या नेत्यांनी यावेळी दिला आहे.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

आरटीओ कार्यालयाकडून दुचाकी वाहनांसाठी ‘MH-08-BP’ ही नवीन मालिका सुरू

Next

अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड तक्रारींची तात्काळ चौकशी करा; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech