
मृत्यू नोंदणी प्रक्रियेत मोठा बदल; सरकारकडून नवे नियम लागू
सप्टेंबर 28, 2026 1 Min Read

1 ऑक्टोबर 2026 पासून मृत्यूची नोंदणी आणि मृत्यू दाखला मिळवण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल लागू होणार आहे. नव्या नियमांनुसार उशिराने नोंदणी केल्यास मंजुरीची प्रक्रिया अधिक कडक करण्यात आली आहे.
एक वर्षाच्या आत नोंदणी स्थानिक प्राधिकरणाकडून होईल, तर एक ते दोन वर्ष विलंब झाल्यास DM/SDM यांची परवानगी आवश्यक असेल. दोन वर्षांपेक्षा अधिक उशिर झाल्यास न्यायिक दंडाधिकाऱ्याचा आदेश अनिवार्य असेल.
सरकारच्या मते, वेळेत नोंदणी वाढवणे आणि गैरप्रकारांना आळा घालणे हा या बदलाचा उद्देश आहे.







