
शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील 9 शिक्षकांचा गौरव

शिक्षक दिनाचे औचित्य साधून नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 वितरण सोहळा पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्रातील 9 गुणवंत शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
डॉ. कविता नृसिंहराव गिट्टे – साने गुरुजी निवासी माध्यमिक विद्यालय, बीड
कुंदा जयवंत बच्छाव – महापालिका शाळा, नाशिक
वैभव वसंतराव कुलकर्णी – जवाहर नवोदय विद्यालय, लातूर
शिवप्रसाद अरविंद टिंगरे – सैनिक स्कूल, सातारा
डॉ. विक्रम विशाल – भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई
डॉ. अमर मोहनराव ताकसांडे – जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय, दत्ता मेघे संस्था, वर्धा
डॉ. संदीपान प्रल्हाद नरोटे – शासकीय तंत्रनिकेतन, सोलापूर
किरण प्रकाश झारकर – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धाराशिव
अर्चना राकेश जाधव – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, त्र्यंबकेश्वर, नाशिक
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण अध्यापन, संशोधन आणि कौशल्याधारित शिक्षणात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल या शिक्षकांना गौरविण्यात आले. या सोहळ्यात देशभरातील 82 शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
शालेय शिक्षण, उच्च शिक्षण आणि कौशल्य विकास क्षेत्रातील महाराष्ट्रातील शिक्षकांनी वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि रोजगाराभिमुख कौशल्यनिर्मितीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.






