Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
गौरी व ७ दिवसांच्या गणपती विसर्जनानिमित्त मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना १९ व २० सप्टेंबरला बंदी
मंडणगड बसस्थानकाच्या नव्या इमारतीमुळे प्रवाशांची गैरसोय दूर होणार: गृह राज्यमंत्री योगेश कदम
मुंबई-गोवा महामार्गावर प्रवाशांचे हालच हाल
NCMC कार्ड योजनेत शिथिलता; प्रवाशांना दिलासा
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेवर ‘जिल्हा सनियंत्रण समिती’ची करडी नजर
गणेशोत्सवात आरोग्य शिबिरांचे आयोजन करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल
परिसरातील चालू घडामोडी

एसआयआर प्रक्रियेत तुमचं नाव सापडलं नाही तर घाबरु नका….

सप्टेंबर 2, 2026 2 Min Read

विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात एसआयआर प्रक्रियेत कोकण विभागातील न सापडलेल्या मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. कोकण विभागातील ७५ मतदारसंघांमध्ये एकूण २ कोटी ४७ लाख ६२ हजार मतदार असून, त्यापैकी सुमारे ७९ लाख मतदार सध्या सापडलेले नाहीत. संबंधित मतदारांची प्रारुप यादी विभागातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांच्या तसेच कोकण विभागाच्या संकेतस्थळावर नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांनी ही यादी तपासून आपले नाव त्यामध्ये आहे का, याची पडताळणी करावी, असे आवाहन कोकण विभागीय आयुक्त तथा एसआयआर निरीक्षक रुबल अग्रवाल यांनी केले आहे.

कोकण विभागात एसआयआर प्रक्रियेसाठी पाच जिल्ह्यांची जबाबदारी विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांच्याकडे निरीक्षक म्हणून सोपविण्यात आली आहे. तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी निरीक्षक म्हणून मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

एसआयआर प्रक्रियेत मतदारांच्या नावांची पडताळणी करताना ७९ लाख मतदार सध्या सापडलेले नाहीत. अशा मतदारांची नावे प्रारूप स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यामुळे संबंधित मतदारांनी आपले नाव मतदार यादीतून वगळले गेले आहे, असा गैरसमज करून घेऊ नये. ज्या पात्र नागरिकांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्याची आवश्यकता आहे, त्यांनी विहित फॉर्म क्रमांक ६ भरून संबंधित मतदान नोंदणी अधिकारी कार्यालयात सादर करावा. हे अर्ज संबंधित मतदान नोंदणी अधिकारी कार्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मतदारांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करून आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करण्याची कार्यवाही पूर्ण करावी.

एसआयआर प्रक्रियेदरम्यान नागरिकांना आपले म्हणणे मांडण्यासाठी दावे व हरकती दाखल करण्यासाठी दि. ३० सप्टेंबर २०२६पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे न सापडलेल्या मतदारांनी तसेच मतदार यादीबाबत काही दुरुस्ती किंवा हरकत असल्यास संबंधितांनी विहित मुदतीत आवश्यक अर्ज सादर करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.

कोकण विभागातील सर्व नागरिकांनी एसआयआर प्रक्रियेकडे गांभीर्याने पाहून प्रसिद्ध करण्यात आलेली प्रारूप यादी तपासावी, स्वतःचे तसेच आपल्या कुटुंबातील पात्र सदस्यांचे नाव मतदार यादीत आहे का, याची खात्री करावी आणि आवश्यकता असल्यास विहित मुदतीत दावा किंवा हरकत दाखल करावी. मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.  प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यासाठी प्रशासनाकडूनही आवश्यक सहकार्य करण्यात येईल,” असेही विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी स्पष्ट केले आहे.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या फुगडीने स्पर्धेला आली रंगत

Next

कलाकारांच्या सहवासात रत्नागिरीत मंगळागौरचा जल्लोष

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech