Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
गौरी व ७ दिवसांच्या गणपती विसर्जनानिमित्त मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना १९ व २० सप्टेंबरला बंदी
मंडणगड बसस्थानकाच्या नव्या इमारतीमुळे प्रवाशांची गैरसोय दूर होणार: गृह राज्यमंत्री योगेश कदम
मुंबई-गोवा महामार्गावर प्रवाशांचे हालच हाल
NCMC कार्ड योजनेत शिथिलता; प्रवाशांना दिलासा
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेवर ‘जिल्हा सनियंत्रण समिती’ची करडी नजर
गणेशोत्सवात आरोग्य शिबिरांचे आयोजन करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल
परिसरातील चालू घडामोडी

समृद्धी महामार्गावर 7 दिवसांचा ब्लॉक; प्रत्येक वाहनावर राहणार डिजिटल नजर

ऑगस्ट 31, 2026 1 Min Read

नागपूर–मुंबई समृद्धी महामार्गावर सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (ITMS) अंतर्गत सिन्नर ते इगतपुरीदरम्यान CCTV गॅन्ट्री बसवण्याचे काम हाती घेण्यात आले असून 31 ऑगस्ट ते 7 सप्टेंबरदरम्यान टप्प्याटप्प्याने वाहतूक ब्लॉक घेतला जाणार आहे.

अलीकडे सिन्नर परिसरात वाहनांचे टायर पंक्चर करून प्रवाशांना लुटल्याच्या घटनांनंतर महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या पार्श्वभूमीवर CCTV आणि तंत्रज्ञानाधारित निगराणी व्यवस्था मजबूत करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

या कामासाठी दोन टप्प्यांत ब्लॉक घेतला जाणार आहे. 31 ऑगस्ट, 1 आणि 2 सप्टेंबर रोजी सिन्नर इंटरचेंज ते भरवीर इंटरचेंजदरम्यान, तर 4, 5 आणि 7 सप्टेंबर रोजी भरवीर ते इगतपुरी या टप्प्यात काम होईल. या कालावधीत मुंबईकडे जाणारी वाहतूक दुपारी 12 ते 1 आणि नागपूरकडे जाणारी वाहतूक दुपारी 3 ते 4 या वेळेत तासभर पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहे. 6 सप्टेंबरला कोणताही ब्लॉक नसणार आहे.

गॅन्ट्री बसवण्यासाठी मोठ्या क्रेन आणि यंत्रसामग्रीचा वापर होणार असल्याने वाहतूक थांबवणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रवाशांनी ब्लॉकच्या वेळा लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, ITMS प्रणालीमुळे महामार्गावरील वाहनांची हालचाल, अपघात, वाहतूक कोंडी आणि संशयास्पद हालचालींवर तात्काळ लक्ष ठेवता येणार आहे. संवेदनशील ठिकाणी CCTV नेटवर्क मजबूत झाल्यास गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवणे आणि आरोपींचा माग काढणे अधिक सुलभ होणार आहे.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

‘रत्नागिरीचा राजा’ आगमन मिरवणुकीनिमित्त रविवारी वाहतूक मार्गात बदल

Next

रत्नागिरीत रंगणार मंगळागौर सोहळा

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech