Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
गौरी व ७ दिवसांच्या गणपती विसर्जनानिमित्त मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना १९ व २० सप्टेंबरला बंदी
मंडणगड बसस्थानकाच्या नव्या इमारतीमुळे प्रवाशांची गैरसोय दूर होणार: गृह राज्यमंत्री योगेश कदम
मुंबई-गोवा महामार्गावर प्रवाशांचे हालच हाल
NCMC कार्ड योजनेत शिथिलता; प्रवाशांना दिलासा
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेवर ‘जिल्हा सनियंत्रण समिती’ची करडी नजर
गणेशोत्सवात आरोग्य शिबिरांचे आयोजन करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल
परिसरातील चालू घडामोडी

मंत्रालयातील ‘क्रीम पोस्टिंग’वर सरकारची मोठी कारवाई; 314 जणांना ‘गो बॅक’

ऑगस्ट 26, 2026 1 Min Read

मुंबई : मंत्रालयातील ‘क्रीम पोस्टिंग’ आणि नियमबाह्य नियुक्त्यांवर राज्य सरकारने मोठी कारवाई करत तब्बल 314 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या तात्काळ रद्द केल्या आहेत. उसनवारी, प्रतिनियुक्ती किंवा केवळ मौखिक आदेशाच्या आधारे कार्यरत असलेल्या या सर्वांना त्यांच्या मूळ कार्यालयात परत पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मंत्रालय आणि मंत्र्यांच्या आस्थापनेवर वर्षानुवर्षे कार्यरत असलेल्या काही अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ‘मलाईदार’ पदांवर मक्तेदारी निर्माण केल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने हा निर्णय घेतल्याचे समजते. विहित प्रक्रिया न पाळता करण्यात आलेल्या नियुक्त्यांवर थेट कारवाईचा बडगा उगारत सरकारने प्रशासनात मोठी खळबळ उडवली आहे.

शासनाच्या निर्देशानुसार, संबंधित 314 अधिकारी-कर्मचाऱ्यांना 10 सप्टेंबर 2026 पर्यंत त्यांच्या मूळ विभागात किंवा कार्यालयात रुजू होणे बंधनकारक आहे. यासंदर्भात संबंधित विभागप्रमुख आणि कार्यालय प्रमुखांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

तसेच, संबंधित कर्मचारी प्रत्यक्ष मूळ पदावर रुजू झाले की नाही, याची खात्री करण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. केवळ कागदोपत्री बदली न होता प्रत्यक्ष उपस्थितीची पडताळणी केली जाणार आहे. सरकारने या कारवाईत कठोर भूमिका घेतली असून, आदेशाचे पालन न करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे वेतन तातडीने बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट आर्थिक परिणाम होणार आहे.

दरम्यान, या संपूर्ण कारवाईचा अंतिम अहवाल 20 सप्टेंबर 2026 पर्यंत मुख्य सचिव कार्यालयाला सादर करावा लागणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेवर उच्चस्तरीय देखरेख ठेवली जाणार आहे.

या निर्णयामुळे मंत्रालयातील ‘क्रीम पोस्टिंग’भोवती निर्माण झालेल्या मक्तेदारीवर मोठा घाव बसल्याची चर्चा असून, भविष्यात अशा नियुक्त्यांबाबत नियमांचे काटेकोर पालन होण्याचे संकेत सरकारने दिले आहेत.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

हापूस आंबा सुद्धा या कातळसड्यांवरच अवलंबून..

Next

राज्यात पावसाची उसंत; काही भागांत ‘यलो अलर्ट’ कायम

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech