
२८ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान मध्यरेल्वेवर विशेष ब्लॉक

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. टिटवाळा स्थानकाच्या प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाच्या कामासाठी २८ ऑगस्टच्या रात्रीपासून ११ सप्टेंबरपर्यंत दररोज सुमारे ६ तासांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
या ब्लॉकचा परिणाम कल्याण–कसारा मार्गावरील लोकल सेवांवर होणार असून काही गाड्या रद्द, काही विलंबित तर काहींच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना पुढील १५ दिवस काही प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो.
मध्य रेल्वेकडून या कामासाठी नियोजनबद्ध पद्धतीने ब्लॉक घेण्यात येत असून, प्रवाशांनी प्रवासापूर्वी वेळापत्रकाची खात्री करूनच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, हे काम पूर्ण झाल्यानंतर टिटवाळा स्थानकावर १५ डब्यांच्या लोकल गाड्यांची सेवा वाढवणे शक्य होणार असून भविष्यात प्रवाशांना अधिक सुविधा मिळणार आहेत.






