Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
गौरी व ७ दिवसांच्या गणपती विसर्जनानिमित्त मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना १९ व २० सप्टेंबरला बंदी
मंडणगड बसस्थानकाच्या नव्या इमारतीमुळे प्रवाशांची गैरसोय दूर होणार: गृह राज्यमंत्री योगेश कदम
मुंबई-गोवा महामार्गावर प्रवाशांचे हालच हाल
NCMC कार्ड योजनेत शिथिलता; प्रवाशांना दिलासा
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेवर ‘जिल्हा सनियंत्रण समिती’ची करडी नजर
गणेशोत्सवात आरोग्य शिबिरांचे आयोजन करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल
परिसरातील चालू घडामोडी

चमोली बोगदा दुर्घटना; 9 कामगारांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

ऑगस्ट 14, 2026 1 Min Read

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात अलकनंदा नदीवरील विष्णुगड-पिंपळकोटी जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात झालेल्या भीषण भूस्खलनात 9 कामगारांचा मृत्यू झाला असून अनेक कामगार अजूनही अडकले आहेत. सध्या सहा कामगारांचा शोध सुरू आहे.

ही दुर्घटना गुरुवारी (13 ऑगस्ट) सायंकाळी सुमारे 7.30 वाजण्याच्या सुमारास घडली. त्यावेळी बोगद्यात 25 हून अधिक कामगार काम करत होते. अचानक झालेल्या स्फोटानंतर बोगद्यात मोठ्या प्रमाणात पाणी आणि ढिगारा शिरल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या दुर्घटनेत जखमी झालेल्या 10 कामगारांवर गोपेश्वर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर एकावर श्रीनगर आणि एकावर पिंपळकोटी येथे उपचार सुरू आहेत. एका जखमीला उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

एनडीआरएफचे सहायक कमांडंट आलोक झायरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोगद्यातील चिखल व पाण्यामुळे बचावकार्याला अडथळे येत असून ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे काही काळासाठी मोहीम स्थगित करण्यात आली होती. मात्र, शुक्रवारी सकाळी पुन्हा बचावकार्य सुरू करण्यात येणार आहे.

टीएचडीसी-एनटीपीसीद्वारे उभारण्यात येत असलेल्या 444 मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पाचे सुमारे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. सुमारे 3.5 किमी लांबीच्या बोगद्यात 1.8 किमी अंतरावर ही दुर्घटना घडली. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बचावकार्य वेगाने सुरू आहे.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

ताज लँड्स एंडला BMCचा दणका; दंडाची रक्कम 103 कोटींवर

Next

‘जागर’वर श्रावणाची मेजवानी…!

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech