Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
केंद्राच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांचे 26 दिवसांचे उपोषण अखेर समाप्त
ग्रामीण जनतेच्या वेळेची अन् पैशांची बचत करण्यासाठी ‘महाराजस्व समाधान शिबीर’ – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ९ हजार १९० कोटींचा वार्षिक पत आराखडा
राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; शेतीला दिलासा
धामणसेत ‘एक झाड – एक पुस्तक’ उपक्रम; ९०० झाडांचे संवर्धन
घाटमाथ्यावर पुन्हा पावसाचा जोर; ताम्हिणीत 200 मिमी नोंद
परिसरातील चालू घडामोडी

रत्नागिरीत उद्योगांना गती; 7,500 कोटींच्या गुंतवणुकीची ना.उदय सामंतांची मोठी घोषणा

जुलै 16, 2026 2 Min Read

 रत्नागिरी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी आणि स्थानिकांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.

     जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित उद्योजकांच्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. बैठकीला आमदार किरण सामंत, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अन्बलगन, उद्योग विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, सह मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, निबे इडिया लिमिटेडचे संचालक गणेश निबे, एआयआयएफएचे संचालक योगेश मंदानी, व्ही आय टी सेमिकाॕन्स पार्क लि.चे संचालक ईश्वर्या कन्नन आदी उपस्थित होते.

       उद्योगमंत्री डॉ. सामंत म्हणाले,  या बैठकीत जिल्ह्यासाठी अनेक मोठ्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून, संरक्षण क्षेत्र, पर्यटन आणि हरित ऊर्जेवर (Green Energy) विशेष भर देण्यात आला आहे.

७,५०० कोटींची गुंतवणूक आणि ग्रीन स्टील प्रकल्प: जिल्ह्यात स्टील उद्योगाच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक होणार आहे. सुमारे ७,५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह ‘ग्रीन स्टील’ प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यातील एक प्रकल्प राजापूर येथे, तर दुसरा प्रकल्प रत्नागिरीत उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

पर्यटनासाठी ‘सी-प्लेन’ सेवा: रत्नागिरीतील पर्यटनाला चालना देण्यासाठी आगामी वर्षभरात ‘सी-प्लेन’ (Sea Plane) सेवा संकल्पना प्रत्यक्षात आणली जाणार आहे.

   संरक्षण क्षेत्राशी संबंधित एक मोठी यंत्रणा आणि प्रकल्प जिल्ह्यात उभा राहणार आहे. समुद्रकिनाऱ्यालगत वाटद किंवा या परिसरामध्ये ‘ शिपयार्ड’  सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

सीएनजी प्रकल्प (CNG Project): रत्नागिरीतील नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणारा सीएनजी प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे. हा प्रकल्प जिल्ह्यासाठी ‘गेम चेंजर’ ठरेल, असा विश्वास डाॕ सामंत यांनी व्यक्त केला.

व्हीआयटी सेमीकंडक्टर प्रकल्पाबाबत – पूर्वी नियोजित असलेल्या ३८,००० कोटी रुपयांच्या सेमीकंडक्टर प्रकल्पाला अमेरिकेतील काही घडामोडींमुळे विलंब झाला असून, त्याचे मूल्य काहीसे कमी झाले आहे. त्यामुळे या प्रकल्पाला जितकी जागा आवश्यक आहे, तितकीच देऊन उर्वरित अतिरिक्त जागा इतर नवीन उद्योगांसाठी वापरण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या सर्व प्रकल्पांमुळे रत्नागिरी जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार असून, मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल, असा विश्वास उद्योगमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

रत्नागिरीत दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी; 5 वर्षीय बालकाला नवजीवन

Next

सावर्डे येथील ‘वालावलकर रुग्णालयात’ २१ व २२ जुलै रोजी मोफत बालरुग्ण शस्त्रक्रिया शिबिर

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech