Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
केंद्राच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांचे 26 दिवसांचे उपोषण अखेर समाप्त
ग्रामीण जनतेच्या वेळेची अन् पैशांची बचत करण्यासाठी ‘महाराजस्व समाधान शिबीर’ – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ९ हजार १९० कोटींचा वार्षिक पत आराखडा
राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; शेतीला दिलासा
धामणसेत ‘एक झाड – एक पुस्तक’ उपक्रम; ९०० झाडांचे संवर्धन
घाटमाथ्यावर पुन्हा पावसाचा जोर; ताम्हिणीत 200 मिमी नोंद
परिसरातील चालू घडामोडी

‘तुर्की-इस्तांबुल’ टूरच्या नावाखाली रत्नागिरीतील प्रतिष्ठित महिलांची फसवणूक

जुलै 4, 2026 1 Min Read

  रत्नागिरी : परदेश सहलीचे स्वप्न दाखवून ‘मेक माय टूरएक्स’ (Make My Tourx) या टूर कंपनीने रत्नागिरीतील दोन महिलांची तब्बल १२ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुर्की-इस्तांबुल सहलीचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संदीप कुमार (रा. रोहिणी, दिल्ली) याच्या विरोधात रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २४ एप्रिल २०२४ ते ११ जून २०२४ या कालावधीत ही घटना घडली. फिर्यादी समृद्धी सुदेश मयेकर (वय ४५, रा. थिबा पॅलेस रोड) आणि त्यांच्या मैत्रिणीने ‘मेक माय टूरएक्स’ या कंपनीशी संपर्क साधला होता. आरोपी संदीप कुमार याने विविध कागदपत्रांचे आणि नियोजनाचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादींकडून ५ लाख रुपये आणि त्यांच्या मैत्रिणीकडून वैभवी विजय खेडेकर यांच्या कुटुंबासाठी ७ लाख ४० हजार रुपये असे एकूण १२ लाख ४० हजार रुपये विविध बँक खात्यांमध्ये जमा करून घेतले.

पैसे भरल्यानंतर आरोपीने ठरल्याप्रमाणे फिर्यादींना परदेशात नेले नाही. वारंवार पाठपुरावा करूनही सहलीचे नियोजन केले नाही आणि भरलेली रक्कमही परत करण्यास टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच समृद्धी मयेकर यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. सोशल मीडिया किंवा ऑनलाइन जाहिरातींना बळी पडून टूर पॅकेज घेताना नागरिकांनी संबंधित कंपनीची विश्वासार्हता तपासणे अत्यंत गरजेचे असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

जास्त विश्वास ‘सोशल मीडिया’वरच !

Next

रत्नागिरी विमानतळाचा ७५% टप्पा पूर्ण; ३ महिन्यात पहिले टेकऑफ तर वर्षभरात पंचतारांकित हॉटेल

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech