
रत्नागिरीत मुसळधार पावसाची नोंद; विजांसह हलक्या सरींची शक्यता
जून 30, 2026 1 Min Read

रत्नागिरी जिल्ह्यात आज दिवसभर आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून दुपारनंतर ते संध्याकाळपर्यंत वातावरण सामान्यतः ढगाळ राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, जिल्ह्यात आज लक्षणीय पावसाची नोंद झाली आहे. विविध तालुक्यांतील पर्जन्यमान पुढीलप्रमाणे—
मंडणगड – 120.25 मिमी
दापोली – 105.00 मिमी
खेड – 65.14 मिमी
चिपळूण – 87.77 मिमी
गुहागर – 127.60 मिमी
संगमेश्वर – 110.00 मिमी
रत्नागिरी – 143.77 मिमी
लांजा – 84.60 मिमी
राजापूर – 106.25 मिमी
आज जिल्ह्यात एकूण 950.38 मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली असून सरासरी पर्जन्यमान 105.59 मिमी इतके आहे.







