Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
केंद्राच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांचे 26 दिवसांचे उपोषण अखेर समाप्त
ग्रामीण जनतेच्या वेळेची अन् पैशांची बचत करण्यासाठी ‘महाराजस्व समाधान शिबीर’ – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ९ हजार १९० कोटींचा वार्षिक पत आराखडा
राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; शेतीला दिलासा
धामणसेत ‘एक झाड – एक पुस्तक’ उपक्रम; ९०० झाडांचे संवर्धन
घाटमाथ्यावर पुन्हा पावसाचा जोर; ताम्हिणीत 200 मिमी नोंद
परिसरातील चालू घडामोडी

चिपळूणच्या गोवळकोट धक्का येथे मान्सूनपूर्व ‘मॉक ड्रिल’

जून 19, 2026 2 Min Read

मान्सून पूर्वतयारी २०२६ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या निर्देशानुसार चिपळूण येथील गोवळकोट धक्का येथे आपत्ती व्यवस्थापनाची ‘रंगीत तालीम’ म्हणजेच मॉक ड्रिल यशस्वीरित्या पार पडली. मान्सूनच्या काळात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तींना तोंड देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा किती तत्पर आहे, याची चाचपणी या माध्यमातून करण्यात आली. “मान्सूनच्या काळात कोणतीही आपत्ती आल्यास प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे आवाहन तहसीलदार प्रविण लोकरे यांनी यावेळी उपस्थित केले.

अचानक गोवळकोट धक्का येथे एक व्यक्ती पाण्यात बुडाल्याची माहिती तहसीलदार कार्यालय आणि नगरपालिकेच्या नियंत्रण कक्षाकडून (कंट्रोल रूम) सर्व संबंधित विभागांना फोनद्वारे देण्यात आली. या संदेशानंतर तात्काळ हालचाली करत सर्व विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी आपापल्या साधनांसह अवघ्या काही मिनिटांत गोवळकोट धक्का येथे दाखल झाले.
​सर्व यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्यानंतर, ही प्रत्यक्षात घडलेली दुर्घटना नसून मान्सून पूर्वतयारीच्या अनुषंगाने घेण्यात आलेले ‘मॉक ड्रिल’ (रंगीत तालीम) असल्याचा निरोप देण्यात आला. यामुळे सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. या तातडीच्या कॉलवर सर्व यंत्रणांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.
​यानंतर उपस्थितांना आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. यामध्ये ​बोट आणि बचाव साहित्य, बोटीचा वापर, लाईफ जॅकेटचे महत्त्व आणि ते वापरण्याची पद्धत.
​ बुडालेल्या व्यक्तीला पाण्यातून बाहेर काढल्यानंतर करायचे प्रथमोपचार.
​नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन: पूर किंवा अतिवृष्टीच्या काळात घ्यावयाची काळजी व उपाययोजना.

​या मॉक ड्रिलबाबत जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष, रत्नागिरी यांना आधीच पूर्वकल्पना देण्यात आली होती. उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या रंगीत तालमीत ​तहसीलदार कार्यालय, चिपळूण, मंडळ अधिकारी गोवळकोट,​ चिपळूण नगरपरिषद फायर ब्रिगेड गाडी, रेस्क्यू बोट आणि लाईफ जॅकेटसह कर्मचारी यांनी सक्रीय सहभाग नोंदवला
​तालुका आरोग्य विभागामार्फत डॉक्टर्स, कर्मचारी आणि सुसज्ज रुग्णवाहिका, ​पोलीस विभाग, गोवळकोटच्या नगरसेविका, ग्राम महसूल अधिकारी आणि स्थानिक ‘आपदा मित्र’ स्वयंसेवक देखील सहभागी होते.
“मान्सूनच्या काळात कोणतीही आपत्ती आल्यास प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे आवाहन तहसीलदार प्रविण लोकरे यांनी यावेळी उपस्थित केले.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

शिवसेना (उबाठा)ला मोठा धक्का, ६ खासदारांचा स्वतंत्र गट

Next

पाण्याअभावी लोटे एमआयडीसीतील उद्योगांना ब्रेक; कोट्यवधींचे नुकसान

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech