Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
केंद्राच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांचे 26 दिवसांचे उपोषण अखेर समाप्त
ग्रामीण जनतेच्या वेळेची अन् पैशांची बचत करण्यासाठी ‘महाराजस्व समाधान शिबीर’ – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ९ हजार १९० कोटींचा वार्षिक पत आराखडा
राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; शेतीला दिलासा
धामणसेत ‘एक झाड – एक पुस्तक’ उपक्रम; ९०० झाडांचे संवर्धन
घाटमाथ्यावर पुन्हा पावसाचा जोर; ताम्हिणीत 200 मिमी नोंद
परिसरातील चालू घडामोडी

रत्नागिरीकरांचे स्वप्न साकार! विमान उड्डाणाचे काऊंटडाउन सुरु

जून 16, 2026 1 Min Read

रत्नागिरीकरांसाठी आनंदाची बातमी…. रत्नागिरी विमानतळावरून लवकरच प्रवासी विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या विमानसेवेसाठी आवश्यक असलेली निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, केंद्राच्या संरक्षण विभागाशी अधिकृत करार झाल्यानंतर विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सामंत यांनी सांगितले की, संबंधित एअरलाईन्स कंपनीने निविदा प्रक्रियेची पूर्तता केली आहे. आता संरक्षण विभागासोबतचा करार पूर्ण होताच प्रवासी विमानसेवेला हिरवा कंदील मिळणार आहे.
यावेळी त्यांनी विमानतळाच्या सद्यस्थितीचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना तांत्रिक आणि पायाभूत सुविधांबाबत आवश्यक सूचना दिल्या. विमानतळाचे उर्वरित काम दर्जेदार पद्धतीने आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, रत्नागिरी विमानतळ केवळ प्रवासी वाहतुकीपुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विमान वाहतूक आणि आधुनिक तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष ओळख व्हावी, यासाठी विशेष उपक्रम राबविण्याचा विचार प्रशासन करत आहे.
रत्नागिरीत विमानसेवा सुरू झाल्यानंतर पर्यटन, उद्योग, व्यापार आणि रोजगाराच्या संधींना मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता जिल्हावासी विमानसेवेच्या पहिल्या उड्डाणाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

अभिनेत्री संचिता उगलेच्या अकाली निधनाने चाहत्यांना धक्का

Next

ऑलिव्ह रिडले संवर्धनाला मोठे यश : १.८६ लाख पिल्ले समुद्रात

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech